चंद्रपूर : चंद्रपुरातील संवाद प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणार्‍या स्त्री शक्ती सन्मान पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, येत्या 8 जानेवारीला स्थानिक इंदिरा गांधी सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय हिरकणी सांस्कृतिक महोत्सवात दुपारी 12 वाजता पुरस्कारप्राप्त महिलांना सन्मानित केले जाणार आहे.

या वर्षीपासूनच या पुरस्कारांची सुरूवात करण्यात आली असून, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या पाच महिलांना दरवर्षी स्त्री शक्ती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खा. बाळू धानोरकर, आ. प्रतिभा धानोरकर, प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, डॉ. चेतन खुटेमाटे, चंद्रकांंत वासाडे, दिनेश चोखारे यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती मंगळवारी येथे आयोजित पत्रपरिषदेत प्रा. विजय बदखल यांनी दिली.

यावर्षीचा राजमाता जिजाऊ मातृ सन्मान पुरस्कार प्रा. प्रभादेवी मुठाळ यांना जाहीर झाला आहे. त्या किलबिल अनाथाश्रम व दत्तक संस्थेच्या संस्थापक आहेत. शेकडो अनाथ बालकांचे त्यांनी संगोपन केले असून, आजपर्यंत 262 बालक या संस्थेतून दत्तक देण्यात आले आहेत. रमाई समता पुरस्काराने वर्षा लांजेवार यांना सन्मानित केले जाईल. नागभीड तालुक्यातील चिंधीचक येथील तीन एकरच्या छोट्या तुकड्यात त्यांनी सेंद्रीय शेतीचे प्रयोग केले. त्यांच्या या प्रयोगाची दखल केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने घेतली आहे. पीक व्यवस्थापन करतानाच राणी हिराई फार्मर कंपनीची त्यांनी स्थापना केली. तर सावित्रीमाई ज्ञानज्योती पुरस्काराने स्मिता जीवतोडे यांना गौरविण्यात येणार आहे. चंद्रपुरातील चांदा पब्लिक स्कूलच्या त्या संचालिका आहेत. या शाळेत 50 टक्के अभ्यासक्रम आणि 50 टक्के व्यक्तिमत्व विकास यावर भर दिला जातो. 2017 ते 2020 मध्ये ब्रिटीश कॉन्सिल अंतर्गत इंटरनॅशनल डायमन्शन अवॉर्ड प्राप्त झाला. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवाव्रती पुरस्काराने निरांजना पायघण-भोयर यांना घोषित झाला आहे.

यंदा एमपीएससीच्या निकालात महिला प्रवर्गातून त्या राज्यात दुसर्‍या, तर ओबीसी प्रवर्गात प्रथम आल्या आहेत. त्यांची उद्योग निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. सोबतच राणी हिराई प्रेरणा पुरस्काराने सुवर्णा धानोरकर यांना सन्मानित केले जाणार आहे. त्या मूळच्या भद्रावतीच्या असून, एका दूरचित्रवाहिनीत त्या वृत्तनिवेदिका आहेत. पत्रपरिषदेला प्रा. विजय बदखल, चंद्रकांत वासाडे, डॉ. चेतन खुटेमाटे, संजय ढवस, दीपक जेऊरकर, डॉ. सचिन धगडी, डॉ. सुधीर मत्ते यांची उपस्थिती होती.

Stree Shakti Samman Award to be given on behalf of Samvad Pratishthan in Chandrapur has been announced and the award winning women will be honored at 12 noon at the Vidarbha level Hirakni Cultural Festival organized at the local Indira Gandhi Auditorium on January 8.

These awards have been started from this year itself, and five women who are doing remarkable work in different fields will be honored with the Stree Shakti Award every year. Eat as Chief Guest at this event. Balu Dhanorkar, Mr. Pratibha Dhanorkar, Principal Dr. Ashok Jeevtode, Dr. Prof. Chetan Khutemate, Chandrakant Vasade, Dinesh Chokhare will be present in the press conference organized here on Tuesday. Vijay Badkhal said.

This year's Rajmata Jijau Matri Samman Award Prof. Prabhadevi Muthal has been announced. She is the founder of Kilbil Orphanage and Adoption.  He has taken care of hundreds of orphans and till date 262 children have been adopted from this institution.  Varsha Lanjewar will be honored with Ramai Samata Award.  He experimented with organic farming in a small plot of three acres at Chindhichak in Nagbhid taluka.  His experiment has been taken note of by the Ministry of Rural Development of the Centre.  He established Rani Hirai Farmer Company while managing crops.  Smita Jeevtode will be honored with Savitrimai Gnyanjyoti Award.  She is the Principal of Chanda Public School in Chandrapur.  This school emphasizes 50 percent curriculum and 50 percent personality development.  Received the International Dimension Award under the British Council from 2017 to 2020.  Also Niranjana Paighan-Bhoyer has been announced with Punyashlok Ahilya Devi Holkar Sevavrati Award.

 This year in the MPSC results, women have come second in the state, while OBCs have come first in the state.  He has been selected as Industry Inspector.  Along with this, Suvarna Dhanorkar will be honored with Rani Hirai Prerna Award.  She is a native of Bhadravati and is a news reporter in a television channel.  Pvt.  Vijay Badkhal, Chandrakant Vasade, Dr.  Chetan Khutemate, Sanjay Dhawas, Deepak Jeurkar, Dr.  Sachin Dhagadi, Dr.  Sudhir Matte was present.