बोंबला..! आंदोलकच मंडप सोडून पळाले; एसीसी कंपनीतील प्रकार
चंद्रपुर Tak
घुग्घूस (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर घुग्घूस व शेजारील नकोडा हे नेहमीच वाढती गुन्हेगारी तसेच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. मात्र आज झालेल्या घटनेत आंदोलकांना शामियाना सोडून पळण्याची नामुष्की ओढावी लागली. या घटनेची चर्चा शहरभर सूरू आहे. एसीसी कंपनीतील न्यू पॅकिंग प्लांट मध्ये कार्यरत कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन सफेदझेंडा कामगार संघटनेच्या वतीने सुरेश पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला 27 जानेवारी पासून शुरूवात करण्यात आली. गेली दोन दिवस शांततेत शुरू असतांना आज दुपारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले.
आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास कामावर जाणारे कामगार विवेक पचारे, यांच्या सह कामावर जाणाऱ्या कामगारांना आंदोलकांनी अडवणूक केली आम्ही संपावर असतांना तुम्ही कामावर कसे जातात बे ? म्हणून
कामगारांना मारहाण केली. सदर माहिती परिसरात पोहचताच अन्य कामगारात तीव्र असंतोष निर्माण झाला तसेच मारहाण झालेला कामगार काँग्रेस नेत्यांचा भाऊ असल्याने काँग्रेस कार्यकर्ते हे पेटून उठले एकीकडे पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवीत असतांना संतप्त कामगारांनी अनशन मंडपावर धावा करीत आंदोलकांना खुर्च्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली.
यामुळे भेदरलेल्या कामगारांनी अनशन मंडप सोडून मिळेल तिकडे पळ काढला या घटनेमूळे संपूर्ण कंपनी व घुग्घूस परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असता घुग्घूस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सिंग व सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघा गोखरे यांनी घटनेचे गांभिर्य पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली व तातळीने दंगा नियंत्रणाला पाचारण केले. उप - विभागीय पोलीस अधिकारी तातळीने घटनास्थळी हजर केले.
फिर्यादी विवेक पचारे यांच्या तक्रारी नुसार क्रीष्णा पाईकराव, शरद पाईकराव, ललित गाताडे, दत्ता वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसरीकडे सफेदझेंडा संघटने तर्फे आंदोलकांनी अनशन मंडपात केलेल्या तक्रार केली असून बातमी लिहण्या पर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया शुरू होती.
गेल्या आठ तासापासून आंदोलनाचा नेतृत्व करणारा सुरेश पाईकराव बेपत्ता झाला आहे. एक दिवसापूर्वीच
पॅकिंग हाऊस कंत्राटदार व जि. आर. इंजिनिअरिंगचे संचालक एच. आर. दत्ता यांनी ही 27 जानेवारी रोजी सांयकाळी पोलीस स्टेशनला आंदोलका विरोधात कामगारांना कामावर जाण्यास मज्जाव करीत असल्याचा गुन्हा नोंदविला आहे. सदर प्रकरण एवढ्या लवकर शांत होणार नसून येणाऱ्या काळात हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता असून सध्या परिसरात शांतीपूर्ण तणावाचे वातावरण आहे.

