• कामगाराचा अद्यापहु बेपत्ताच

• महाआऔष्णिक विज केंद्रात होता तो कामावर

चंद्रपूर : शहराला लागून असलेल्या दुर्गापूर येथील औष्णिक महा वीज केंद्रातून घरी परतणाऱ्या एका कामगाराला काल बुधवारी रात्रीच्या सुमारास पट्टेदार वाघाने उचलून दिल्याचे खळबळजनक घटना समोर आली आहे अद्यापही त्या कामगाराचा शोध लागलेला नाही. भोजराज मेश्राम (वय 59) रा. वैद्यनगर तुकुम असे कामगाराचे नाव आहे. या घटनेने वैद्य नगर तुकूम व महाऔष्णिक विज केंद्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भोजराज मेश्राम (वय 59) रा. वैद्यनगर तुकुम
हे विज निर्मिती केंद्रात कामगार म्हणून कार्यरत आहेत. काल बुधवारी दिवसा ते कामावर गेले होते. दरम्यान रात्री 10.30 वाजताच्या सुमारास ते घरी परत येत असताना पट्टेदार वाघाने त्यांना उचलून नेल्याची घटना समोर आली आहे. वृत्त लिहीपर्यंत त्या कामगाराचा मृतदेह मिळालेला नाही. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या परिसरात वाघांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. दिवसागणिक नागरिकांना वाघाचे दर्शन होणे ही नित्याची बाब झालेली आहे. अशातच महाऔष्णिक विज केंद्रात कामकरणा-या कामगाराची घटना समोर आल्याने एकच दहशत निर्माण झाली आहे.

वैद्यनगर तुकुम हा परिसर महाऔष्णीक विज केंद्राला लागूनच आहे. भोजराज मेश्राम हे सिटीपीएस मधील कुणाल कंपनीत काम करीत होते. युनिट क्र 8 व 9 मधील बेल्टचा काम करीत असल्याची माहिती आहे. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास ते काम आटोपंल्याने घराकडे येत असतांना आत मधील रस्त्यावरच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून उचलून नेल्याची माहिती समोर आली आहे. अजूनपर्यंत त्यांचे शव मिळालेले नाही.