घुग्घूस (चंद्रपूर) : येथील अमराई वार्डाता खळबळजनक घटना घडली आहे. येथे वास्तव्यस असणारे गजानन मड़ावी यांचे घर अचानकपने हलायला लागले. त्यामुळे कुटूंब घाबरले. घाबरलेल्या स्थितीत घरातील सदस्य घराबाहेर पडलेत. त्याच वेळी अचानकपणे घर जमीनीत सत्तर ते अंशी फुट आत जमिनीत गेले. सदर घटना वेकोलीच्या खानीमुळेच घडत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. 


सदर घटनेची माहिती मिळताच कांग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यानी जिल्हाधिकारी, तहसिलदार वेकोली अधिकारी यांना घटनेची माहिती दिली. कांग्रेस नेते सैय्यद अनवर यानी घटनास्थळी धाव घेवून महावितरण अधिकारी ढुमने यांना सांगून विद्युत पुरवठा बंदा करायला लावला. ठानेदार बबन राव पूसाटे यांना बोलाविण्यात आला. घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. पोलीसांनी गर्दी पांगाविण्याचे काम केले. घटनास्थळी कांग्रेसचे नेते रोशन पचारे, पवन आगदारी, दंतलवार, नुरुल सिद्दीकी उपस्थित होते. या घटनेने शहरात दहशत निर्माण झाली आहे.

का घडली ही घटना ?

सन 1980 च्या पूर्वी घुग्घुस परिसरात रॉबर्टसन इक्लाइन भूमिगत तीन  कोळसा खाणी होत्या. ज्यामध्ये घुग्घुस इंक्लाईंन क्रमांक एक, दुसरी पिट्स इंक्लाईंन, तीसरी नकोडा इंक्लाईंन यांच्या समावेश होता. भुमीगत खदानी बंद करण्यात आल्या आणि खुल्या खदानी सूरू झाल्यात. मात्र 2016 मध्ये वेकोली व्यवस्थापनाने घुग्घुस खुल्या खदानी बंद केल्या. 

मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जमीन ओली झाली आहे.त्यामुळे भुखल्लनाचे प्रकार आता घडत आहे. खबरादारी म्हणून प्रशासनाने या भागातील नागरिकांना सूरक्षितस्थळी हलविण्याचे कार्य आरंभले आहे.