घुग्घुस : येथील प्रतिष्ठित व्यापारी गीतांजली बार अँड रेस्टॉरंटचे संचालक सदय्या कारपाका व नागराज कारपाका यांच्या मातोश्री कोमरम्मा रायनरसु कारूपाका वय 70 वर्ष यांचे 11 ऑक्टोबर रोजी राहते घरी जवळपास अकरा वाजता निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुली दोन मुलं व नातवंड असा मोठा आप्तपरिवार असून त्यांचा पार्थिव शरिरावर महातारदेवी शेंणगाव रस्त्यावरील शेतशिवारात दिनांक 12 ऑक्टोबर रोजी दुपारी दिड वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे कळाले आहे