घुग्घूस : येथील नवएकता जय सेवा बहुउद्देशीय संस्था चांदागड घुग्घूस, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा संस्था नकोडा व आदिवासी समाज बांधवां तर्फे राजा रावण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन बंद करण्या संदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद, व पोलीस निरीक्षक घुग्घूस याना निवेदन देण्यात आले.

आदिवासी गोंड समुदाय हा राजा रावणाला आपले पूर्वज कुलदैवत म्हणून त्यांची पूजा करतात. त्यांच्या मतानुसार रावण हे न्यायप्रिय, विवेकवादी, महिलांची इज्जत करणारे, शिस्तप्रिय आहे. भारतातील तामिळनाडू राज्यात रावणाचे 352 मंदिरे आहेत मध्यप्रदेश येथे पंधरा मिटर प्रतिमा आहे.

रावण प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनाने आदिवासी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या जातात यामुळे रावण दहन आयोजित करणाऱ्यांवर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत तसेच भांदवी 1960 अंतर्गत 153 अ 295, 298 मुंबई पोलीस ऍक्ट 131,134,135 नुसार फौजदारी गुन्हा करावा अशी ही मागणी करण्यात आली.

निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गणेश किन्नाके,देविदास किवे, मंदेश्वर पेंदोर, कवडू मडावी, विठ्ठल कुमरे, दिपक पेंदोर,कुणाल टेकाम, राकेश तिरणकार, विकास मेश्राम, अर्जुन परचाके, नितीन किन्नाके, पराग पेंदोर, हरीश चांदेकर,केशव टेकाम, विजय आत्राम, सतीश आत्राम, सुभाष तुमराम, नंदू नैताम, संदीप तोडासे, अजय उइके, बंटी जुमनाके, अरविंद किवे, विठ्ठल कुमरे, मनीष आत्राम, मनोज चांदेकर, व मोठ्या संख्येने आदिवासी समाज उपस्थित होता.