पत्नीचा खून करून पतीनेही केली आत्महत्या

घुग्घुस (चंद्रपूर) : ऑनलाईन रमी खेळाच्या आहारी जावून कर्जबाजारी झालेल्या एका पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. पत्नीचा स्वत:च्या हातून खून झाल्याने घराशेजारील एका खोल विहीरीत मोठ्या भावाला मरणाची माहिती देवून स्व:तही आत्महत्या केल्याची खळबळजणक घटना चंद्रपूरात घडली आहे. स्नेहा डहूले असे मृतक पत्नीचे तर सुधाकर डहूले असे पतीचे नाव आहे. कौटूंबिक कारणातून घडलेल्या घटनेत पती पत्नीचा जिव गेल्याने देवाडा गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

चंद्रपूर शहराला लागून असलेल्या पडोली पोलिस स्टेशन हद्दीतील आणि मुळचे घुग्घूस येथील रहिवासी सुधाकर डहूले यांचे देवाडा येथील महाकाली परिसरात वास्तव्य होते. बऱ्यांपासून ते या ठिकाणी राहून इलेक्ट्रिशियनच व्यवसाय करीत होते. याच व्यवयायातून मिळणराऱ्या मिळतीवर त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र त्यांना ऑनलाईन रमी खेळाच्या छंद जडल्याने ते या खेळाच्या आहारी गेले होते. यातून पती व पत्नीमध्ये अधूनमधून भांडण होत होते. वर्षभरापूर्वी आणि महिनाभरापूवीही त्यांने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. इलेक्ट्रिशियन व्यवसायातून मिळणारा सर्व पैसा रमी खेळात ऑनलाईन द्वारे खर्च करीत होता.


आज सोमवारी (8 ऑगस्ट) रोजी दुपारच्या सुमारास याच कौटुंबिक वादातून पती पत्नी मध्ये भांडण झाले. कडाक्याचे भांडण विकोपाला गेल्याने पती सुधाकर प्रथम पत्नी स्नेहा हिचा घरीच गळा आवळून खून केला. पत्नी जागीच मृत्यूझाल्याने त्यानेही स्व:त जिवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुधाकर डहूले यांने आपल्या मोठ्या भावाला पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. व आपणही आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यांनतर महाकाली परिसरातील स्व:तच्या घराजवळील गजानन महाराज मंदिर परिसरातील एका खोल विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. लगेच मोठ्या भावाने पडोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन सर्वप्रथम पत्नीचा रक्तयाच्या थारोळ्यात पडलेलया मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनाकरीता पाठविला. त्यांनतर त्याने आत्महत्या केलेल्या विहिरीचा शोध घेण्यात आला. गजानन महाराज मंदिर परिसरात खोलगट विहीर आहे. त्या ठिकाणी शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह आढळून आला.

जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन टीमला पाचारण करून मृतदेह विहरितून काढण्याची कारवाई करण्यात आली. बऱ्याच प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीकरीता पाठविण्यात आले. सदर घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आली. त्यांनी लगेच घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

पोलिसाना मिळालेल्या माहितीनुसार, मृतक हा रमी खेळाच्या आहारी जावून कर्जबाजारी झाला होता. सुमारे विस लाख रूपये त्यांनी या खेळाकरीता कर्ज केलेला होता. मोठ्या भावाने त्यापैकी बराच कर्ज चुकता केला होता. वारंवार त्याला अशा खेळापासून थांबविण्याचा प्रयत्न पत्नीने केला होता. परंतु ऑनलाईन खेळाच्या आहारी गेलेला सुधाकर पत्नीचेही ऐकत नव्हता, त्यामुळेच त्यांच्या भांडण होत होते. डहुले कूटूंब हे मुळचे घुग्घूसचे होते. परंतु पडोली पोलिस स्टेशन हद्दीतील देवाडा गावात ते बऱ्याच वर्षापासून महाकाली परिसरातील भागात राहते होते. या ठिकाणी इलेक्ट्रिशीयनचे काम करीत होता. त्यातून मिळणाऱ्या कमाईवर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालत होता. परंतु ऑनलाईन खेळाच्या आहार जावून कर्जबाजारी झालेल्या पतीने पत्नीचा खून करून स्वत:ही आत्महत्या केल्याचे दोघांचेही जिव गेले आहे. पुढील तपास पडोली पोलिस पोलिस करीत आहेत.

A debt-ridden husband strangled his wife after becoming addicted to online rummy games.  A sensational incident has taken place in Chandrapur where after his wife was killed by his own hands, he committed suicide by informing his elder brother about her death in a deep well near the house.  Deceased wife's name is Sneha Dahule and husband's name is Sudhakar Dahule.  Due to the death of a husband and wife in an incident due to family reasons, grief is being expressed in Devada village.

Sudhakar Dahule, a resident of Padoli police station area adjacent to Chandrapur town and originally from Ghughoos, lived in Mahakali area of ​​Devada.  He was living in this place for a long time and was working as an electrician.  The livelihood of his family depended on the income from this business.  But as he got fond of online rummy game, he got addicted to this game.  Due to this, there was occasional quarrel between husband and wife.  He tried to commit suicide a year ago and a month ago.  The electrician was spending all the money he got from his business playing Rummy online.

Today, on Monday (August 8) around noon, a fight broke out between the husband and wife due to the same family dispute.  Sudhakar first strangled his wife Sneha to death at home after a heated argument.  As his wife died on the spot, he also decided to end his journey on his own.  After that, Sudhakar Dahule informed his elder brother about the murder of his wife.  And he also said that he is committing suicide.  After that, he committed suicide by jumping into a deep well in Gajanan Maharaj Mandir area near his house in Mahakali area.  Immediately the elder brother informed the Padoli police.  The police reached the spot and first took the body of the wife lying in a pool of blood and took it into custody and sent it for post-mortem.  After that the well where he committed suicide was searched.  There is a deep well in Gajanan Maharaj temple area.  His body was found during a search at that place.

The disaster management team of the district was called and action was taken to exhume the bodies.  After many efforts, the body was taken out and sent for post-mortem.  The information about the said incident was given to the District Superintendent of Police, Deputy Divisional Police Officer.  He immediately visited the spot and inspected it.

According to the information received by the police, the deceased was addicted to rummy game and got into debt.  He had borrowed around twenty lakh rupees for this game.  The elder brother had repaid many of those loans.  His wife had repeatedly tried to stop him from such a game.  But Sudhakar, who was addicted to online games, was not even listening to his wife, that's why they were fighting.  Dahule Kutoomb was originally from Gugghus.  But he was living in Mahakali area in Devada village under Padoli police station limits for many years.  He was working as an electrician at this place.  The family was living on the income earned from it.  But the husband, who became addicted to online games, killed his wife and committed suicide, both of them lost their lives.  Further investigation is being conducted by Padoli Police.