चंद्रपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, राजमाता जिजाऊ जयंती, माणिक उर्फ महाकाली जंगम जयंती व माता प्रमिला माणिक जंगम स्मृतिनिमित्त आज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात 'महापुरुषांच्या स्वप्नातील भारत संवैधानिक मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची वर्तमान परिस्थिती' या विषयावर प्रसिद्ध वक्त्या प्रा. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 

यावेळी दिलीप सोळंके हे देखील विचार मांडतील. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.