चंद्रपूर Jaika Motors मध्ये भिषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
चंद्रपुर Tak
चंद्रपूर : येथील टाटा कंपनीच्या कारचे अधिकृत विक्रेता नागपुर मार्गावरील जायका मोटर्सला भिषण आग लागली असल्याची माहिती मिळाली असून शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या आगीत नवीन स्पेअर स्पार्ट आगीत भस्मसात झाले असून कॅम्युटर व महत्वाची कागदपत्रे जळाले आहेत. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
जयका मोटर्समध्ये टाटा कंपनीचे नवीन वाहनांची व जुन्या वाहनांची दुरुस्ती केली जाते. सर्व कामे आटोपल्यानंतर सर्व कर्मचारी घरी परतल्यानंतर ही भिषण आग लागली.
