वाघांच्या बंदोबस्तासाठी घेतली राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चंद्रपुरात उच्चस्तरीय बैठक
चंद्रपुर Tak
नितीन भटारकर यांच्या उपोषण मंडपास भेट
चंद्रपूर : शहराला लागून असलेल्या दुर्गापुर, ऊर्जानगर, , महाऔष्णिक केंद्र व वेकोली परिसरात वाघ व बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी राज्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज शनिवारी (19 फेब्रुवारी 2022) ला चंद्रपुरात येऊन तातडीची उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत तत्काळ वाघ बिबट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सुचना देत राज्यस्तरावर कोणतीही अडचण येऊ देणार नाही, याबाबत आश्वस्त केले. दोन दिवसात दोघांचा वाघाने बळी घेतल्यानंतर राज्यमंत्र्यांनी तातडीने चंद्रपूरात येवून दौरा केला.
दि. १६ व १७ फेब्रुवारी २०२२ या सलग दोन दिवसात दोघांना वाघाने ठार केल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केल्या जात आहे. हिंस्त्र प्राण्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभाग चंद्रपूर यांच्याकडे वारंवार प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन मागणी करण्यात आली होती, परंतु वनविभागातर्फे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.त्यामुळे वनविभागाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी वनविभागाच्या विरोधात अन्यत्याग आंदोलन सुरू केले आहे. घटनांचे गांर्भीय लक्षात घेता महाऔष्णिक विज केंद्राचे कामगार तसेच नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवून वाघ बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरली आहे.
काल जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने वाघाच्या बंदोबस्तासाठी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक बोलावून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. आज शनिवारी राज्यमंत्री तथा चंद्रपुर जिल्ह्याचे संपर्कमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्ह्याचा तातडीने दौरा केला. जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य अभियंता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, मुख्य वनसंरक्षक वनवृत्त चंद्रपूर यांची उपस्थिती होती. महाऔष्णिकविज केंद्रातील कामगार भोजराज मेश्राम व दुर्गापूर येथील 16 वर्षाचा मुलगा राज भडके याचा दोन दिससात वस्तीत येवून वाघ व बिबट्याने ठार केल्यानंतर
या परिसरात प्रचंड भितीचे वातावरण पसरलेले आहे. कामगारामध्ये असुरक्षिता निर्माण झाल्याने संपर्क मंत्री तनपूरे यांनी या वाघांना जेरबंद करण्यासंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच शासन स्तरावरील ज्या काही परवानगी आहे त्या तात्काळ देण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. राज्यमंत्री यांच्या आदेशानंतर वाघाचा बंदोबस्त करण्याच्या प्रक्रियेला वेग आलेला असून सर्व स्तरावरील हालचाली वाढलेल्या आहे.
त्यानंतर त्यांनीमहाऔष्णिक विज केंद्र व वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळ परिसराची पाहणी केली. नितीन भटारकर यांच्या उपोषणस्थळी येऊन परिसरातील सर्वसामान्य नागरिक तसेच विविध पक्षातील नेते व पदाधिकारी यांचेशी चर्चा केली. लवकरात लवकर वाघांना जेरबंद करण्यात येईल असे आश्वस्त केले. या प्रक्रियेवर स्वतः लक्ष देऊन कोणत्याही स्वरूपाची शासन स्तरावरील परवानगी थांबणार नाही अशी ग्वाही दिली.
