रेल्वेपुलाचे कार्य मुंगीच्या गतीने सुरू असल्याने काँग्रेसचा हल्लाबोल
घुग्घुस : ते पुणे महामार्गावरील राजीव रतन रुग्णालया समोर रेल्वे गेट वरील उड्डाणपुलाचे काम अत्यंत मंद गतीने शुरु असल्याने शहरातील वाहतुकीच्या कोंडी ही सर्वसामान्य नागरिकासाठी जीवघेणी व डोकेदुखीची ठरत आहे. दिवसभर एकेरी मार्गाने जड वाहतूक सुरू असते व त्यात दर अर्ध्या तासात गेट पडत असल्याने वेकोली वसाहतीत राहणारे नागरिक नरक यातना भोगत आहे.
घुग्घुस महातारदेवी मंजूर झालेला रस्ता पुलाच्या कामामुळे रखडलेला आहे. राजीव रतन रेल्वे गेट, महातरदेवी रोड वरील खड्डे बुजविण्यात कंपनी कामचुकार पणा करीत आहे.
आतापर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली नाही. शहरातील नागरिकांच्या जिवितेला धोखा झाल्यास पुल निर्माण करणाऱ्या कंपनीने नुकसान भरपाई द्यायलाच हवी आदी मुद्द्याने घेवून घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दंतलवार, विशाल मादर, तिरुपती महाकाली, थॉमस अर्णाकोंडा, कपिल गोगला, अंकेश मडावी, व अन्य पदाधिाऱ्यांनी पुल निर्माण करणाऱ्या कंपनी कार्यालयावर हल्ला बोल करून कंपनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले याप्रसंगी शहरातील जागरूक पत्रकार ही उपस्तिथ झाले. येत्या आठवड्यात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे मान्य करीत. रस्त्यांचे खड्डे परत बुजविण्याचे कार्य शूरू करण्यात आले आहे.
Since the work of the flyover on the railway gate in front of the Rajiv Ratan Hospital on the Pune highway has started at a very slow pace, the traffic jams in the city are becoming life-threatening and a headache for the common citizen. The residents of WCL Colony are living in hell as there is heavy traffic on the one way road all day long and the gate falls every half an hour.
The road approved by Ghugus Mahatardevi is blocked due to bridge work. The company is doing negligent work in plugging potholes on Rajiv Ratan Railway Gate, Mahatardevi Road.
So far no ambulance has been provided. Ghugus Congress president Rajureddy, labor leader Syed Anwar, Roshan Dantalwar, Vishal Madar, Tirupati Mahakali, Thomas Arnakonda, Kapil Gogla, Ankesh Madavi, and other office bearers of the bridge builders took up the issue of the bridge construction company having to pay compensation if the lives of the city's citizens are betrayed. The aware journalists of the city were present on the occasion of the attack on the company office and kept the company officials on edge. They agreed to provide an ambulance in the coming weeks. The work of filling the potholes of the roads has been started.