दोन कोटी जनता करणार "धन्यवाद मोदींजी"
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांची माहिती
चंद्रपूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नधान्य योजनेंतर्गत नागरिकांना मोफत धान्य वितरीत करण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरीबांची चिंता करीत असल्याने दोन कोटी जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद करणार आहे. याकरीता "धन्यवाद मोदींजी" अशा आशयाचा मजकूर असलेले पोष्ट कार्ड नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार आहे. याकरीता अभियान हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती विजयी संकल्प सभेदरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी दिली.
कोरोनाचे देशावर संकट आल्यानंतर देशभर लॉकडाऊन लागले. तेव्हापासून नागरिकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नधान्य योजनेंतर्गत मोफत अन्नधान्य पुरविले जात आहे. संकटकाळात प्रधानमंत्र्यांनी नागरिकांच्या पाठीशी उभे राहून मदत केल्याने नागरिक प्रधानमंत्र्यांना धन्यवाद देणार आहेत. याकरीता भाजपच्या वतीने एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. दोन कोटी नागरिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पोष्ट कार्ड लिहिणार आहेत. त्या पोष्ट कार्डवर "धन्यवाद मोदीजी" अशा आशयाच्या मजकूरातून पोस्ट कार्डद्वारे धन्यवाद करणार आहेत. 25 लाख नागरिकांनी लिहिलेले पोष्टकार्ड जमा केलेले आहे. 2024 पर्यंत दोन करोड पोष्ट कार्डद्वारे धन्यवाद करण्याची नियोजन करण्यात आले आहे. काल सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख्र बावणकुळे यांनी "मिशन 145" चा शुभारंभ चंद्रपूरातून करण्यात आला, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याकरीता भाजपाचे वतीने नियोजन करण्यात आले आहे. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते या मोहिमेकरीता परिश्रम घेत आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांचेसोबत 25 लाख युवा योध्दे काम करण्यास इच्छूक असल्यानरे फ्रेन्डर्स ऑफ बिजेपी अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियाना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात राबविण्यात येत आहे. 18 ते 25 वर्षवयोगटातील युवकांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे 25 लाख "युवा योद्यांना" मोदीजींसोबत काम संधी मिळणार आहे. महाराष्ट्रात भारतीय जनात पार्टी ही 51 टक्के असावी असा संकल्प भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय अध्यक्षांचा हा संकल्प पूर्ण करण्याची ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी विजयी संकल्प सभेला संबोधीत करताना दिली.
महाविकासआघाडी सरकारने ओबीसींचे आरक्षण संपविले : बावणकुळे
अडीच वर्ष सत्तेत राहिलेल्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे आरक्षण संपविले. परंतु बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे एकनाथ शिंदे व भाजपाने युती करून राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे व फडणवीस यांचे डब्ल डेक्क्र इंजिन असलेल्या सरकारने ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. अडीच वर्षात महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना एक रूपयाही दिला नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकारने हेक्टरी 15 हजार रूपये बोनस शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विदर्भातील अकरा खासदार व 50 आमदार निवडून आणू अशी ग्वाही त्यांनी सभे प्रसंगी दिली.