जनता महाविद्यालयात विज्ञान व तंत्रज्ञानवर नॅशनल ई-सेमिनारचे उद्घाटन संपन्न
चंद्रपुर Tak
चंद्रपुर : चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालीत जनता महाविद्यालयात विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांवर नॅशनल ई-सेमिनारचे उद्घाटन नुकतेच (दि.८) ला आभासी स्वरुपात संपन्न झाले. सदर सेमिनार हे दि. ८ ते १४ फेब्रुवारी पर्यंत सुरु असणार आहे. यात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजिवशास्त्र या विषयांचा समावेश आहे.
सेमिनारचे उद्घाटन कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले. स्वागताध्यक्ष संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जिवतोडे हे होते. समन्वयक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, नॅक समन्वयक डॉ. एन. आर. बेग, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रविण जोगी, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मुकुंद शेंडे, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी.जे. खिंची, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. के.सी.पाटील, सूक्ष्मजिवशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस.एस. वनकर, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम.एल. जिवतोडे आदी उपस्थित होते.
सेमिनारमधे प्रमुख व्याख्याते न्यू दिल्ली विद्यापिठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. धनराज मश्राम, मुंबई विद्यापिठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. भुषण पोपटकर हे होते. सेमिनारचे संचालन डॉ. मनिषा महातळे, डॉ. एम.एल. जिवतोडे, तर आभार डॉ. अमोल ढवस यांनी केले. यावेळी आभासी पध्दतीने विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
