शेतमजुरांना नेणारा पिकअप उलटला ; 43 शेतमजुर जखमी
चंद्रपूर : शेतमजूराना घेऊन निघालेले पिकअप वाहन उलटले. यात 43 मजूर जखमी झाले आहेत. ही घटना चिमूर तालुक्यातील गोदेंडा-खांबाळा मार्गावर आज घडली. या घटनेत सूदैवाने जिवीतहाणी झालेली नाही. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
जिल्ह्यात जोरदार पाऊस सूरू आहे.त्यामुळे शेतीच्या कामाला गती आली आहे. मजूरांची कमतरता असल्याने पिकअप, ऑटोने मजूरांना शेतात नेल्या जात आहे. चिमूर तालुक्यातील येरखडा येथील पिकअप वाहनाने केवाडा गावातील शेतमजुर गोंदेडा -खांबाडा मार्गावरील मनोज वाघे यांचा शेताकडे घेऊन जात असातांना पिकअप वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला वाहन उलटले. या वाहनात 43 मजूर होते. अपघात होताच आसपासचे शेतकरी, शेतमजुर धावून गेलेत. वाहनात दबलेल्या जखमींना त्यांनी बाहेर काढले. जखमींना उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे हलविण्यात आले आहे. या अपघातात 19 शेतमजुर गंभीर जखमी झालेत तर 24 शेतमजूर किरकोड जखमी झाले आहेत.
A pickup truck carrying farm laborers overturned. 43 workers were injured. The incident took place on Godenda-Khambala road in Chimur taluka today. Fortunately no casualties were reported in the incident. The injured have been shifted to hospital for treatment.
It is raining heavily in the district. Due to shortage of labor, workers are being taken to the field by pickup and auto. Manoj Waghe, a farm laborer from Govada-Khambada road in Kevada village, was being taken to a field by a pick-up vehicle at Yerkhada in Chimur taluka when the pick-up driver lost control and overturned on the side of the road. The vehicle had 43 laborers. As soon as the accident took place, the surrounding farmers and farm laborers ran away. They pulled out the wounded who had been crushed in the vehicle. The injured have been shifted to Neri Primary Health Center for treatment. In this accident 19 agricultural laborers were seriously injured while 24 agricultural laborers were slightly injured.
