औरंगाबाद : मनसेची (MNS) 1 मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये निघाले आहेत. यादरम्यान राज ठाकरे Raj Thakrey यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. औरंगाबाद जवळील वाळूज येथे हा अपघात घडल्याची माहिती आहे. या ताफ्यातील गाड्यांचा दोनवेळा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

या अगोदर घोडेगाव येथे काही वेळांपूर्वी ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला होता. त्यामध्ये दोन गाड्यांचे नुकसान झाले होते. वाळूज येथे पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या गाडीलाही अपघात झाला आहे. या अपघातात बारा गाड्यांचे नुकसान झाले आहे. राज ठाकरे औरंगाबादेत पोहचले आहेत.

उद्या औरंगाबादमध्ये मनसेची सभा होणार आहे. या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेवर राज्यातून टीका होतं आहेत. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला होता.