चंद्रपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाद्वारे चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासामध्ये भर घालण्याकरिता हा महामार्ग घुग्घुसमार्गे राजुरापर्यंत 142 किलोमीटर लांबीचा तयार करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मस्त्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे.

चंद्रपूर जिल्हा आदिवासी बहुल व जंगल व्याप्त असून, ताडोबा सारख्या राष्ट्रीय उद्यानास देश विदेशातून पर्यटक भेट देतात. हा जिल्हा विविध खनिजांनी समृध्द असून जिल्ह्याची अर्थव्यवस्था, विद्युत निमिती, खनिन उद्योग व सिमेंट उद्योगाभोवती केंद्रीत आहे. त्यामुळे राज्याच्या या भागातील वाहनांनादेखील समृध्दी महामार्गाव्दारे मुंबईकरीता सर्वात कमी अंतराची तसेच जलदगती महामार्गाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. तसेच या भागातील वाहनामुळे समृध्दी महामार्गाच्या पथकर संकलनात वाढ होऊन प्रकल्पास पूरक होईल. त्यामुळे याकरिता या लांबीचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली होती.

सध्यस्थितीत या महामार्गाचा विस्तार नागपूरपासून गोंदिया व नागपूरपासून गडचिरोली तसेच गोंदिया ते गडचिरोली असा प्रस्तावित असून, त्याकरिताचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरीता सल्लागार नियुक्ती करण्यात आलेली आहे व त्याचा सविस्तर प्रकल्प तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत प्रगतीत आहे.

प्रस्तावित नागपूर ते चंद्रपूरपर्यंत अस्तित्वातील लांबी 135 किलोमीटर असून, प्रिनफिल्ड रेखान लांबी साधारणतः 120 किलोमीटर आहे. तसेच राजुरापर्यंत अस्तित्वातील लोगो 165 किलोमीटर असून, विस्तारीत नागपूर मुंबई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग ते नागपूर ते चंद्रपूर या भागाची ग्रिनफिल्ड संरेखन लांबी 142 किलोमीटर आहे. हिंदुहृदयसम्राट समृध्दी महामार्गाचा नागपूर ते चंद्रपूर-राजूरापर्यत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून व भुसंपादन करण्यासाठी अंदाजे 20 कोटी इतका निधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास निधी स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी विनंती मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

In order to add to the development of Chandrapur district through Hinduheart Emperor Balasaheb Thackeray, the state's Minister of Forests, Cultural Affairs, Entertainment, Sudhir Mungantiwar had directly met Chief Minister Eknath Shinde and demanded that this highway should be constructed with a length of 142 km through Ghugus to Rajura.  This demand has been accepted by the Chief Minister.

 Chandrapur district is dominated by tribals and forests, national parks like Tadoba are visited by tourists from all over the country.  The district is rich in various minerals and the economy of the district is centered around the power sector, mining industry and cement industry.  Therefore, the vehicles of this part of the state will also be able to get the facility of shortest distance and fast highway to Mumbai through Samrudhi Highway.  Also, the vehicle in this area will complement the project by increasing the road toll collection of Samrudhi Highway.  Therefore, Mungantiwar demanded that a detailed project report of this length should be prepared.