चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथील शेत शिवारात काम करीत असताना वादळी वारा सह मोठ्याने मेघगर्जनेसह पाऊस आल्याने शेतातील काम थांबवून दोन महिला व दोन युती घराकडे निघाल्या असता रस्त्यात त्यांच्यावर वीज कोसळल्याने चौघींचाही मृत्यू झाला. सदर घटना वायगाव भोयर शेतशिवारात आज शनिवारी (30 जुलै) रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली

वरोरा तालुक्यातील चिमूर रोड लगत असलेल्या वायगाव भोयर येथील वरोरा पंचायत समिती चे माजी सदस्य शालिक झाडे यांच्या शेतात त्यांच्या पत्नी हिरावती शालीक झाडे व मधुमती सुरेश झाडे (वय 45), पार्वता रमेश झाडे, रिता नामदेव गजबे (वय 20) या चौघी 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास शेतात काम करावयास गेल्या. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मे गर्जनेसह वादळी पाऊस आला त्यामुळे त्या चौघी ही घराकडे जाण्यास निघाल्या असता पाऊस जोरदार असल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाचा आसरा घेतला त्याच ठिकाणी वीज पडल्याने चौघींचाही मृत्यू झाला. झाडे कुटुंबातील तीन महिला यामध्ये दोन युतींचा समावेश

वायगाव भोयर येथील झाडे कुटुंबातील दोन महिला व एका युवतीचा समावेश आहे तर एक युवती ही वायगाव येथील रहिवासी आहे मृतक मधुमती सुरेश झाडे ही वरोरा येथील आनंदनिकेतन महाविद्यालय वाणिज्य इंग्रजी माध्यम प्रथम वर्षाला शिकत होती. पळसाचे झाड ठरले कर्दनकाळ

जोरदार पाऊस असल्याने रस्त्याने जात असताना चौघींना पळसाचे झाड दिसले त्या झाडाचा आसरा घेतला आणि ते झाड चौघींच्या मृत्यूसाठी कारण ठरले.

While they were working in the field at Vaigaon Bhoyer in Varora taluka, due to strong wind and rain accompanied by thunder and lightning, two women and two other women stopped working in the field and were going home when lightning struck them on the road. The said incident took place in Vaigaon Bhoyer Shetshiwar today Saturday (July 30) at around five o'clock in the evening

His wife Hirawati Shalik Zade and Madhumati Suresh Zade (age 45), Parvata Ramesh Zade, Rita Namdev Gajbe (age 20) on the morning of 30th July in the farm of former Varora Panchayat Samiti member Shalik Zade at Vaigaon Bhoir near Chimur Road in Varora taluka. Went to work in the field around 11 o'clock. At around 5 o'clock in the evening, there was a thunderstorm with thunder, so when the four of them started to go home, due to the heavy rain, they took shelter of a tree on the side of the road. Three women in the tree family include two alliances

The Zade family of Vaigaon Bhoir consists of two women and one young woman while one young woman is a resident of Vaigaon. The deceased Madhumati Suresh Zade was studying first year of English medium in Anandniketan College of Commerce, Varora. The Palasa tree became the Kardankala

As it was raining heavily, while walking on the road, the four saw a palasa tree and took shelter under that tree and that tree became the reason for the death of the four.