चंद्रपुरात कारवा बिटात आढळला वाघीणीचा मृतदेह
चंद्रपुर Tak
चंद्रपूर : मध्य चांदा वनविभागाचे बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कारवा बेटात 1नियत वनक्षेत्राचे कक्ष क्रमांक 500 मध्ये एका मादी वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज शनिवारी (27 नोव्हेंबर) ला उघडकीस आली आहे. चारदिवसांपूर्वींच वाघिणीचा मृत्यू झाल्याचे वनाधिका-यांचे म्हणने आहे.
मृतावस्थेत आढळून आलेली मादी वाघीण 5 ते 6 वर्षाची आहे. तीन, चार दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. वाघिणीचे संपूर्ण अवयव सुरक्षित आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे मार्गदर्शक तत्वानुसार पशुधन अधिकारी डाँक्टर विलास ताजने,डाँक्टर कुंदन पोडशेलवार यांनी वाघिणीचे शवविच्छेदन करून मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी व्हिसेरा नमुने घेण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर कारवा मध्यवर्ती रोपवाटीकेत वाघिणीचे दहन करण्यात आले.
