उपवर -वधु परिचय मेळावा व गुंतवत विद्यार्थीचा सत्कार समारंभ
• एम.बी.बी.एस. एम.डी.डॉक्टर व वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांचा सत्कार
• चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा गौड कलार समाजांचा वतीने होणार गौरव
चंद्रपूर : चंद्रपूर - गडचिरोली जिल्हा गौड कलार समाजांचा वतीने भव्य उपवर -वधु परिचय मेळावा व गुंतवत विद्यार्थीचा सत्कार व कलार, कलाल समाजातील उत्कृष्ट समाज कार्यात सहभागी होणा-या एम.बी.बी.एस. एम.डी.डॉक्टर व वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रसह विदर्भ मराठवाडा मधील गौड कलार,कलाल समाज जागृती दिशेने वाटचाल करीत आहे. विविध ठिकाणी समाजाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यारया संघटना समाज कार्यात प्रभावीपणे कार्यरत आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा गौड कलार, कलाल समाज सेवा मंडळ चंद्रपूर च्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा सभागृह चंद्रपूर दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी उपवर -वधु परिचय मेळावा व गुंतवत विद्यार्थीचा सत्कार व समाजातील एम.बी.बी.एसएम.डी.डॉक्टर वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा.ना. श्री. सुधीर मुनगंटीवार मंत्री -वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, पालकमंत्री चंद्रपूर तथा गोंदिया जिल्हा , विशेष मुख्य अतिथी मा. श्री बाळुभाऊ धानोरकर खासदार, चंद्रपूर -वणी - आर्णी लोकसभा, मा. श्री.किशोर जोरगेवार आमदार , विधानसभा चंद्रपूर , कार्यक्रम अध्यक्ष श्री. स्वामी गौड माजी विधान परिषद सदस्य हैदराबाद, श्री सुमन गौड तलवार सिने सुपरस्टार तेलंगणा, श्रीमती सूश्री प्रीती चौकसे बॉलिवूड साऊथ अभिनेत्री, श्री मुकेश चौकसे डायरेक्टर मुंबई, मार्गदर्शक श्री.डॉ. वटीकुटी रामाराव गौड जय गौड केंद्रीय कमेटी अध्यक्ष, कार्यक्रम स्वागताध्यक्ष श्री नारायण गौड सिलेवार अध्यक्ष विदर्भ गौड कलार, कलाल समाज महासंघ, आयोजक चंद्रपूर - गडचिरोली गौड कलार समाज व युवा गौड संघटना, महीला संघटना यांनी सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याची आव्हान केले आहे.