>> मोर्च्या विरोधात विरोधकांचे सोशल मीडियावर कुरबुरी

चंद्रपूर : जिल्ह्यातील अती प्रदूषणकारी कंपनी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली Lloyd's Metal's कंपनीचे लवकरच विस्तारीकरण होणार असून 750 कोटी रुपयांचा नवीन कारखाना निर्माण होत आहे.

या नवीन कारखान्याला शुरू करण्या आधी प्रदूषण कमी करावा व या कारखान्यात शहरातीलच युवकांना रोजगार द्यावा या मागणीला घेवून काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकरा वाजता गांधी चौक घुग्घुस येथून लोयडस गेट येथून मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात प्रदूषण व बेरोजगारीने त्रस्त असलेले नागरिक संख्येने नागरिक शामिल होतील असा अंदाज आहे. लॉयड्स कंपनीने मोर्च्याला घेवून अजून पर्यन्त कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही.


मात्र, कंपनीची पाठराखण करण्यासाठी घुग्घुस लॉयड्स मेंटल्स संघर्ष कामगार संघटनेचा कामगार नेता अशपाक शेख पुढे आलेला आहे.

तो काँग्रेस नेत्यांवर विविध स्वरूपाचे आरोप करीत आहे. आणि त्यांनी केलेले आरोप भाजप पक्षातर्फे समाज माध्यमातून प्रसारित केल्या जात असल्याने हा मोर्चा अनेकांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे.