Crime : रागाचा भरात मित्रांनी पोटात बिआरची बाटल खुपसली; बल्हारशहातील घटना
चंद्रपुर Tak
चंद्रपूर : बिअर साठी पैसे दिले नाही म्हणून २ मित्रांनी आपल्याच मित्राच्या पोटात बिअरची बॉटल खुपसल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात उघडकीस आली आहे. बल्लारपूर शहरातील बिरसा मुंडा चौकातील ही घटना असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे तिन्ही मित्र बिअर पीत बसले होते. मात्र आणखी बिअर पिण्यासाठी आरोपींनी शाहरुख पठाण या मित्राला पैसे मागितले. मात्र त्यानी नकार देताच इतर दोघांनी बिअर ची बॉटल त्याच्या पोटात खुपसली. गंभीर जखमी झालेल्या शाहरुखला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर आरोपी नीरज यादव आणि अंकित रामटेके यांना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

