उभ्या टाटा मॅजिकला अचानक आग : वाहन जळून खाक
चंद्रपुर Tak
नादुरुस्त अग्निशमन वाहणामुळे काँग्रेस-भाजप आमनेसामने
चंद्रपूर : मूल-सिंदेवाही मार्गांवर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या टाटा मँजीला अचानक आग लागली. बघता बघता वाहन जळून खाक झाले. ही घटना आज सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडली. मूल बस स्थानकासमोर घडली.
प्राप्त माहीतीनुसार , रवि कल्लुरवार यांच्या मालकीचे टाटा मँजीक क्र. MH34-D-2455 वाहन उभे असताना अचानक वाहनाला शार्ट सर्किट झाल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली. जळालेल्या वाहणाला विझविण्यासाठी मूल नगर पालिकेच्या अग्निशमन वाहणाला पाचारण करण्यात आले मात्र अग्निशमन वाहन मागील एक महिन्यापासून नागपूर येथे दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. नाली चोक अप करण्याची मशीन गाडी आणून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मूल नगर पालिकेची अग्निशमन वाहण उपलब्ध असती तर जळलेली प्रवाशी वाहन विझविण्यास मदत झाली असती. आजपर्यंत मुल नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता होती, काही दिवस झाले प्रशासक बसले परंतु अग्निशामक गाडी हे बऱ्याच दिवसापासून बंद असल्याने आज आग लागलेली गाडी जळून खाक झाली. असा आरोप यनिमित्याने काँग्रेसचे सुरेश फुलझेले यांनी केला तर भाजपाचे प्रशांत समर्थ यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मूल नगरपालिकेला आजपर्यंत एकही निधी दिला नसल्याने आज असा प्रसंग सोसावा लागला.
असे एकमेकांवर आरोप करत सर्च टीव्हीजवळ बोलून दाखविले. घटनास्थळावर मूल पोलीस पोहचून तपास करीत आहे.
