घुग्घुस : अमराई वॉर्ड येथील विवाहीत महिलेने आज दुपारी 2 वाजता दरम्यान राहते घरी स्वयंपाक घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव शारदा रामचंद्र कलपेल्ली (40) वर्ष असे आहे.

सदर घटनेची तक्रार घुग्घूस पोलीस स्टेशन येथे देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मर्ग दाखल करून प्रेत शवविच्छेद करण्या करीता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविले. पुढील तपास घुग्घूस पोलीस करीत आहे.