विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप
चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील टोले नांदगाव जिल्हा परिषद शाळेला अनेकदा मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांनी शनिवारी शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले.
गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या वेडगाव केंद्रात टोले नांदगाव जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे. या शाळेत इयत्ता 1 ते 4 वर्गासाठी दोन शिक्षक होते. मात्र शाळेतील एका शिक्षकांची प्रतिनियुक्ती शेजारील हिवरा शाळेत करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब पालकांच्या लक्षात आली. ही प्रतीनियुक्ती रद्द करुन या शाळेतील शिक्षक पुर्ववत ठेवण्यात यावा, यासाठी गावतील शाळा व्यवस्थापण समितीच्या पदाधिकार्यांसह ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.
23 सप्टेंबरला शिक्षक शाळेत रुजू न झाल्यास दूसर्याच दिवशी म्हणजे 24 सप्टेंबरला शाळेला कुलूप लावू, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला होता. शनिवार दिवस उजडला. शाळाही भरली. मात्र शिक्षक आलेच नाही. विद्यार्थ्यांनी गुरुजींची बराच वेळ वाट बघितली. मात्र शिक्षक येईना. अखेर गावकर्यांनी संतप्त होऊन शाळेला कुलूप ठोकले. यावेळी दर्शनी भागात खरडा चिपकवला. त्यात आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आम्हाला हा मार्ग पत्करावा लागल्याचे नमूद करीत शिक्षक देईपर्यंत शाळा भरणार नसल्याचा निर्धारही व्यक्त केला. परंतु, हा प्रकार घडूनही शिक्षण विभागातील कुणीही अधिकार्यांनी शाळाला भेट देण्याची तसदी घेतली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
Angry students, parents and office bearers of the school management committee locked the entrance of the Tole Nandgaon Zilla Parishad School in Gondpipari taluka on Saturday for not getting teachers despite repeated demands.
Tole Nandgaon Zilla Parishad School is included in Vedgaon Center under Gondpipari Panchayat Samiti. This school had two teachers for class 1 to 4. However, one of the teachers of the school was deputed to the neighboring Hivra school. As a result, the parents realized that the students were suffering academically. To cancel this deputation and retain the teachers of this school, the villagers along with the officials of the school management committee of the village gave a statement to the Cadre Development Officer and the Group Education Officer.
The statement also warned that if the teachers do not join the school on September 23, the school will be locked on the next day i.e. September 24. Saturday dawned. The school was also full. But the teacher did not come. Students waited for Guruji for a long time. But the teacher did not come. Finally the villagers got angry and locked the school. At this time, the rough was glued to the facade. It stated that due to our demand being ignored, we had to take this route and also expressed our determination that the school will not be opened until the teachers are provided. However, even after this incident, none of the officials from the education department bothered to visit the school, the villagers said.
