मुस्लिम समाजाला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या पत्रकार नौशाद विरोधात तक्रार
चंद्रपुर Tak
घुग्घूस : येथील अंजुमन मुस्तफा मुस्लिम अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थे तर्फे आज सांयकाळी पोलीस स्टेशन येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवानी सर्च टी व्हीचे पत्रकार नौशाद शेख यांच्या विरोधात कारवाई करिता ठाणेदार बबनराव पुसाटे यांना निवेदनातून केली आहे.
19 फेब्रुवारी रोजी बँक ऑफ इंडिया परिसरात कादिर शेख या युवकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली मृतदेहा जवळ आप्त नातेवाईक विलाप करीत असतांना नौशाद शेख हे चित्रीकरण करीत होते.
संतप्त जमावाने त्यांना चित्रीकरण करण्यास मनाई केली असता त्याठिकाणी पत्रकार व जमावात बाचा - बाची झाली व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. संतप्त जमावाने पत्रकारावर हल्ला चढविला असता पत्रकाराने पोलीस स्टेशन येथे पळ काढला व त्याठिकाणी मुस्लिम समाजाला उल्लेखून अत्यंत घाणेरड्या रित्या अश्लील शिवीगाळ केली.
यामुळे मुस्लिम समाजात संतापाची लाट पसरली सदर पत्रकार हा सुद्धा मुस्लिम असून तो विकृत असल्याचा आरोप करीत जमावाने कायदेशीर कारवाई करिता निवेदनातुन मागणी केली

