घुग्घूस (चंद्रपूर) : कधी भाजपाचा गड असलेले घुग्घूस शहरातून भाजपाला चांगलेच हादरे बसत आहेत. ऐण नगर परिषदेचा निवडणूकीच्या तोंडावर भाजपाचे बरेच कार्यकर्ते काँग्रेसचा तंबूत शिरले. यात दादाचे विश्वासू कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. कार्यकर्त्यांना गळती लागल्याने घुग्घूस न.प. मध्ये भाजपाची सत्ता बसविण्यासाठी देवराव भोंगळे यांच्या कस लागणार आहे.

संपूर्ण जिल्ह्याचे सदैव आकर्षणाचे व चर्चेत राहणाऱ्या मिनी इंडियाचे लौकिक प्राप्त औद्योगिक शहर घुग्घूस येथे पहील्यांदाच नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहे. सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून निवडणूकीच्या तैयारीला लागले आहेत. जिल्ह्यातील वजनदार नेते व भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा आपल्याच शहरात कस लागतांना दिसत आहे. ऐन निवळणुकीच्या तोंडावर दादांचे कट्टर समर्थक मोठ्या संख्येने पक्ष सोडून जात असल्याने भाजपाला घुग्घूस मध्ये खिंडार पडले आहेत. भोंगळे यांच्या कार्यकाळात सध्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला. भाजपच्या हातातले महातरदेवी, वढा या ग्रामपंचायती काँग्रेसने खेचून नेल्या. नकोडा वगळता परिसरात भाजपला सत्ता स्थापन करता आले नाही. तर मागील दोन - तीन महिन्यापासून भाजप नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने काँग्रेस मध्ये जात आहेत.

तंटामुक्त समिती अध्यक्षाचे चार भावांनी एकाचवेळी काँग्रेस मध्ये जाऊन खळबळ माजवली होती. तर 26 तारखेला प्रभारी सरपंच संतोष नूने यांच्या वॉर्डातील जवळपास शंभर ते दीडशे कार्यकर्ते एकाचवेळी काँग्रेस मध्ये गेल्याने भाजपला निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. जिल्हा सांभाळता संभाळता दादांचीच जमीन कमकुवत होत असल्याने जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहेत.