केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांना आश्वासन

चंद्रपूर : येथील चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत करून सभागृहाचे लक्ष वेधले होते तर आमदार आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही चौकशीची मागणी केली होती. खासदार महोदयांच्या मागणीची दखल घेत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांना सिबीआय चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने पुन्हा राजकीय वर्तूळात बँकेतील गैरव्यवहाराची चर्चा सुरू झाली आहे.


काही दिवसांपूर्वी खासदार धानोरकर यांनी या बँकेतील गैरव्यवहाराबद्दल लोकसभेत लक्ष वेधले होते. या बँकेच्या संचालक मंडळावर काँग्रेसचे नेते व राज्यातील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे वर्चस्व आहे. गेल्या काही वर्षांपासून या बँकेतील गैरव्यवहार चर्चा सर्वत्र रंगली आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. पदभरती व खासगी बँकांमध्ये बँकेतील ठेव गुंतविण्याचे प्रकरण उपस्थित करीत बँकेवर प्रशासक असतानाही संचालक मंडळ बेकायदेशीरपणे काम करीत असल्याचा गंभीर आरोप खासदर बाळू धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित केला.


ऐवढेच नव्हे तर आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही चौकशी करण्याची मागणी लावून धरली. वारंवार मागणी होत असताना केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. खासदार धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेतील गैरव्यवहाराची सिबीआय चौकशी करण्याचे आश्वासन खासदार महादेयांना दिले आहे. त्यामुळे भविष्यात चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेतील गैरव्यवहाराच्या चर्चा सध्यातरी थांबण्याची शक्यता नाही.