घुग्घुस-चंद्रपूर मुख्य मार्गावरील ATM फोडण्याचा प्रयत्न
घुग्घुस : येथून जवळच असलेल्या पांढरकवडा येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्याने अयशस्वी प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवार 30 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला.
घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील पांढरकवडा येथील रस्त्यालगत बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. गावाची लोकसंख्या जवळपास दीड ते दोन हजाराच्या जवळपास आहे. गावात चारही बाजूने व घुग्घुस-चंद्रपूर मार्गावर आणी एटीएम मध्ये सीसीटीवी कॅमेरे लागलेले आहे. तरी सुद्धा एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्याने केला.
एटीएम मधील रोख रक्कम चोरीस गेलेली नाही अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. फिर्यादी दीपक मधुकर नामेवार खाजगी नौकर यांच्या तक्रारीवरून घुग्घुस पोलीस ठाण्यात कलम ३७९, ५११ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत कळताच पो. नि. बबन पुसाटे, सहा. पो. नि. मेघा गोखरे, पो. उप. नि. गौरीशंकर आमटे यांनी घटनास्थळाची पाहाणी केली. दरम्यान श्वान पथकास पाचारण करण्यात आले. अज्ञात आरोपीचा पोलीस शोध घेत असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
It was revealed on Wednesday 30 November morning that a thief had unsuccessfully attempted to break into the ATM of the Bank of Maharashtra Bank at Pandharkawada, which is near here. On Tuesday, November 29, at midnight, an unknown thief tried to break the ATM machine.
There is a Bank of Maharashtra Bank ATM along the road at Pandharkawada on the Ghugus-Chandrapur road. The population of the village is around one and a half to two thousand. CCTV cameras are installed on all sides of the village and on the Ghugus-Chandrapur road and in ATMs. However, the thief tried to break the ATM.
Police sources have informed that the cash from the ATM has not been stolen. A case under section 379, 511 has been registered in Ghugus police station on the complaint of a private servant named Deepak Madhukar.
As soon as he came to know about this, No. Baban Pusate, six. Po. No. Megha Gokhare, Po. Sub. No. Gaurishankar Amte inspected the incident site. Meanwhile, the dog team was called. The police are searching for the unknown accused and are conducting further investigation.
