जेवणाचा डब्बा खायला तो आई-वडिलांपासून दूर गेला अन्...
चंद्रपूर : वडिलांसोबत शेतात गेलेल्या नऊ वर्षीय मुलगा जेवणाचा डब्बा खाण्याकरीता शेतातीलच एका धुऱ्यावर गेला. त्याचवेळी बिबट्याने हल्ला केला. मुलाला अर्धा किलोमीटर बिबट्याने फरफटत नेले. त्याला वाचवण्यासाठी आई-वडील धावून गेलेत. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डोळ्या देखत मुलाच्या जीव जाताना बघण्याची दूदैवी वेळ आई-वडिलावर ओढवली. ही घटना कोरपणा तालुक्यात येणाऱ्या जांभोळा शेतशिवारात घडली. नितीन आत्राम असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
जांभोळा गावातील नितीन आत्राम हा नऊ वर्षाचा मुलगा आई-वडिलांसोबत रविवारला शेतात गेला होता. सायंकाळपर्यंत आईवडिल शेतात काम करीत होते. दरम्यान मुलाला भूक लागल्याने तो आईवडिलांनी त्याच्यासाठी आणलेला डब्बा खाण्याकरीता शेतातीलच एका धुऱ्यावर गेला होता. आईवडिल एकीकडे काम करीत होते.
मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास शेतशिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याचेवर हल्ला चढविला. घटनास्थळापासून त्या चिमुकल्याला बिबट्याने अर्धा किलोमीटर फरफटत नेले. लगतच जनावरे चारत असलेल्या देवराव धुर्वे यांला सदर घटना लक्षात आली. त्यांनी मुलाला वाचविण्याकरीता प्रचंड आरडाओरड केली. आई - वडिलांनी मुलाला वाचविण्याकरीता घटनास्थळाकडे धाव घेतली. परंतु, तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.
A nine-year-old boy, who had gone to the farm with his father, went to a chimney in the farm to eat a box of food. At the same time the leopard attacked. The child was dragged half a kilometer by the leopard. His parents ran to save him. But by then it was too late. The fateful time of seeing the child's death was forced upon the parents. This incident took place in Jambhola farm in Korpana taluka. The name of the boy who died in the leopard attack is Nitin Atram.
Nitin Atram, a nine-year-old boy from Jambhola village, went to the farm with his parents on Sunday. Parents were working in the field till evening. Meanwhile, the boy was hungry, so he went to a field in the field to eat the box that his parents had brought for him. Parents were working on one side.
However, around five in the evening, a leopard that was sitting in the farm shed attacked him. The leopard dragged the toddler half a kilometer away from the spot. Devrao Dhurve, who was grazing animals, noticed the incident. They screamed loudly to save the child. Parents rushed to the spot to save the child. But by then the children had died. This incident has spread panic in the area.
