चंद्रपूर : चिमुर तालुक्यात मुक्ताई धबधबा पर्यटनासह विदर्भात पा्रसिध्दी स्थळ आहे. सध्या पर्यटनस्थळावर प्रचंड गर्दी होवून पर्यटक पर्यटनाचा मनमुराद आनंद लूटत आहेत. परंतु याच पर्यटनस्थळापासून काही अंतरावर असलेल्या झरी  धबधब्यावरही पर्यटनासाठी पोहचत आहेत. चहूबाजूंनी डोंगरदऱ्या, हिरवेहिरवे नैसर्गीक सौंदर्य प्रचंड दाट जंगल असल्यानरे या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्याची मजा काही औरच असते. मात्र या स्थळावर आपण जात असाल तर जरा सावधान..! व्हा. या घनदाट जंगलपरिसरात वाघांसह विविध हिस्र्प्राण्यांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आपली एक चुक आयुष्यासाठी हानीकारक ठरू शकते. 

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या मुक्ताई धबधबा पर्यटनासाठी प्रसिध्दी स्थळ आहे. मागील दोन वर्षात कोरोनाच्या स्थितीमुळे या ठिकाणी पर्यटकांचे येणे बंद होते.  मा्र दोन वर्षाच्या कार्यकाळानंतर आणि यावेळी जिल्ह्यात जुलै महिण्याच्या वरूण राजाच्या धूमनंतर या ठिकाणी धबधब्यावर नैसर्गीक सौंदर्य फुलले आहे. त्यामुळे या स्थळावर प्रचंड पर्यटकांची गर्दी उसळली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पर्यटकांच्या दृष्टीने हा स्थळ सुरक्षीत असल्याने या ठिकाणी नागरिकांनी पर्यटनाचा आनंद लुटताना कोणतीही अडचण निर्माण होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात या मुक्ताई धबधब्याची चर्चा पंचक्रोशीत असते. 

याच चिमूर तालुक्यात आणि स्थळापासून काही अंतरावर झरी धबधब्याचे ठिकाण आहे. चारही बाजूंनी हिरवेगार घनदाट जंगल, डोंगराच्या रांगा आहेत. त्या धबधब्यातून ओसंडून वाहणारे पाणी पर्यटकांना मोहीत केल्याशिवाय राहत नाही. परंतु हे स्थळ घनदाट जंगलात असल्याने या ठिकाणी वन्यप्राण्यांचे वावर आहे. मुक्ताईच्या धबधब्याला भेट दिल्यानंतर काही पर्यटकांचे पाऊल या झरी धबधब्याकडे वळतात. आणि ते या ठिकाणी येऊन पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करतात. परंतु पर्यटकांचा हा आनंद क्षणीक ठरू शकतो. जिवाला हाणी पोहचविणारा ठरू शकतो. त्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना सावधान करणे आता गरजेचे झाले आहे. 

चिमूर तालुक्यातील नवतळा गावापासून अवघ्या 2 किमी अंतरावर झरीचा छोटासा धबधबा प्रसिद्ध ठिकाण आहे. ह्या ठिकाणी सुद्धा काही पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. या पर्यटनस्थळाची फारशी प्रसिध्दी झालेली नाही. मात्र मुक्ताई धबधब्यावर गेल्यानंतर हौसी पर्यटकांना याची माहिती मिळते. त्यामुळे पर्यटक जवळच आल्यानंतर त्या ठिकाणी भेट देण्याचा विचार करतात. मात्र हे भेट देणे जिवावर बेतू शकते. चिमुर वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या झरी पर्यटनस्थळ परिसरात हिस्त्र वन्य प्राण्यांचा वावर आहे.  या जंगल परिसरात गावाततील नागरिकांना, गुराख्यांना व परिसरातून आवागमन करणाऱ्यांनाही त्यांचे अनेकदा दर्शन झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या  परिसरातील नागरिक सावधगिरी बाळगून आहेत. जंगल परिसर घनदाट वृक्षांनी नटलेले असल्याने वाघ, बिबट,अस्वल आणि  विविध  प्रकारच्या वन्यजिवांचे वास्तव्य या ठिकाणी आहे. घनदाट अरण्यामुळे या परिसरात हौशी पर्यटक आले आणि हिस्त्रप्राण्यांचा  सामना झालाच तर सामोरे जाणारा प्रसंग जिवावर बेतनारा ठरू शकतो. त्यामुळे यामुळे झरी पर्यटनाला येतायं तर सावधानता बाळगा... असा इशारा देणे पर्यटनाच्या दृष्टीकोणातून महत्वाचे ठरते आहे. 

Muktai Falls in Chimur taluka is a famous place in Vidarbha with tourism.  At present, the tourists are enjoying the pleasure of tourism due to the huge crowd at the tourist spot.  But the Zari waterfall, which is some distance away from this tourist spot, is also being visited for tourism.  Surrounded by hills, lush green natural beauty and dense forests, the fun of tourism in this place is something else.  But if you are going to this place, be careful..!  be  It has been found that various animals including tigers are living in this dense forest area.  So one of our mistakes can be harmful for life.

Currently, Muktai Waterfall is a popular tourist destination in Chandrapur district.  In the last two years, tourists stopped coming to this place due to the Corona situation.  After two years of tenure and this time after Varun Raja's dhoom in the month of July in the district, the natural beauty of the waterfall has blossomed at this place.  Therefore, it is seen that there is a huge crowd of tourists at this place.  Since this place is safe from the point of view of tourists, there is no problem when citizens enjoy tourism in this place.  Therefore, the discussion of this Muktai waterfall during the rainy season is in Panchkrosha.

In the same Chimur taluk and some distance from the site is the place of Zari Falls.  There are dense green forests, mountain ranges on all four sides.  The overflowing water from that waterfall does not fail to attract tourists.  But as this place is in a dense forest, there is a lot of wild animals in this place.  After visiting the Muktai Falls, some tourists' footsteps turn towards this spring waterfall.  And they double the pleasure of tourism by coming to this place.  But this happiness of tourists can be momentary.  It can be life-threatening.  Therefore, it is now necessary to warn the tourists going to this place.

Just 2 km from Navtala village in Chimur taluk, the small waterfall of Zari is a famous place.  Some tourists also come here for tourism.  This tourist place is not very popular.  But after going to Muktai Falls, Housi tourists come to know about it.  So tourists think of visiting that place after coming nearby.  But this visit can be fatal.  The Zari tourist spot, which is under the Chimur forest area, is home to wild animals.  Villagers, cowherds and passers-by have often seen them in this forest area.  So the citizens of this area are being cautious.  As the forest area is covered with dense trees, tigers, leopards, bears and various types of wild life live in this place.  Due to the dense forest, amateur tourists come to this area and encountering wild animals can be life-threatening.  So, if you are coming to Zari tourism, be careful... It is important from the point of view of tourism to give this warning.