Taking notice of Congress complaint: Visit of District Health Officers to Ghugus Primary Health Centre

घुग्घूस : येथे शासकीय रुग्णालय आहे खरे मात्र रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध नाही. स्वच्छतेचे अभाव. स्वच्छ पिण्याच्या पाणी नाही. या समस्या तात्काळ सोडावा, अशी मागणी घेऊन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर व शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांची प्रत्यक्ष भेट घेवून मागणी केली होती.


काँग्रेसच्या मागणीची जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.गहलोत यांनी दखल घेतली. आज डॉ.गहलोत यानी रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाचा आढावा घेतला व वैद्यकीय अधिकारी कुंडू यांना समस्याचे निवारण करण्याचा सूचना दिल्या. येत्या आठ दिवसांत औषधी सह सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी शहरातील नागरिकांना व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे की सार्वजनिक रुग्णालयाला मदतीची आवश्यकता असून सर्वांनी आपल्या क्षमते प्रमाणे मदत करावी त्याठिकाणी घाण होऊ नये याकडे लक्ष द्यावे तसेच रुग्णालयात सर्वच वैद्यकीय अधिकारी या मातृशक्ती महिला शक्ती असून त्यांच्याशी सौजन्याने वागण्याचा प्रयत्न करावा व एक आदर्श शासकीय रुग्णालय निर्मितीस हातभार लावावा अशी विनंती केली आहे. 

#Chandrapurpost