आज अनशन पेंडाल उठणार ?

घुग्घूस : नकोडा येथील ग्रामपंचायतने आंदोलनाला दिलेल्या परवानगी विरोधात भाजप नेते व माजी सभापती ब्रिजभूषण पाझारे यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी पेंडाल व परवानगीची मौका चौकशी करून खालील प्रमाणे अहवाल दिला आहे.


ग्रामपंचायत नकोडा येथील सरपंच श्री.किरण बांदूरकर यांनी ग्रामपंचायतच्या जागेवर उपोषण करण्यास देण्यात आलेले ना हरकत प्रमाणपत्र व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 38 (1) नुसार पंचायतीच्या संमतीशिवाय दिल्यामूळे विधिग्राहय आहे असे दिसून येत नाही.


या आशयाचे पत्र आज नकोडा येथे पोहचताच आंदोलका मध्ये एकच खळबळ उडाली असून अनशन पेंडाल उठविण्याच्या तैयारीला सुरुवात होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.