चंद्रपूर : जंगलात दिसणारे वाघ, बिबट आता थेट शहरात दाखल होत आहे. वाघ, बिबट्याचा हल्यात दोघे ठार झाल्याची घटना जिल्ह्यात घडली. या वाघ, बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.अश्यात दुर्गापूर येथे एका वाघाला पकडण्यात वनविभागाला यश आले.

वाघ, बिबट यांची दहशत असतांनाचा आता अस्वलीने शहरात पाय ठेवले आहे. वडगाव चौकातील विद्यानिकेतन स्कुल परिसरात चारचाकी जाणाऱ्या पिंटू जोशी यांना अस्वल दिसली. त्यांनी या अस्वलीचा विडीओ बनविला. मागील काही दिवसापासून दूर्गापूर येथे वाघ, बिबट्यांचा मुक्तसंचार आहे.

वाघाचा हल्यात एक कामगार ठार झाला होता.तर बिबट्याने गावातून 16 वर्षाचा मुलाला उचलले. यानंतर नागरिकात कमालीचा संताप बघायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर यांनी वाघाला जेरबंद करा ही मागणी लावून धरीत उपोषणाला बसले. तर सर्व लोकप्रतीनीधी एकत्र येत वाघ, बिबट्याचा बंदोबस्त करा ही एकमुखी मागणी केली. अखेर वनविभागाला एका वाघाला जेरबंद करण्यात यश आले. वाघ, बिबट यांची दहशत असतांनाच आता अस्वल दिसल्याने शहरात भिती पसरली आहे.