चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहीतीचा आधारे टाकलेल्या धाडीत 31 लाखांचा गांजा जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली.तर दोन आरोपी फरार झाले आहेत.

प्राप्त माहीतीनुसार, गडचीरोली जिल्ह्यातून चंद्रपूर शहाराकडे 31 लाखांचा गांजासह मुद्देमाल येत असल्याची गुप्त माहीती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहीतीचा आधारे पोलीसांनी मुल-चंद्रपूर मार्गावरील चिचपल्ली गावाजवळील शेर-ऐ-पंजाब ढाब्याजवळ पाळत ठेवली. होंडा सिटी, मारूती स्विप्ट या दोन गाड्यांची झडती घेतली असता गाडीत 120 किलो गांजा आढळून आला.गाडीत असलेल्या श्रीनिवास नरसय्या मचेडी, शंकर बलय्या घंटा या दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दोन आरोपी फरार झाले आहेत.
अटकेत असलेले दोन्ही आरोपी तेलंगणा राज्यातील आहेत.ही कार्यवाही पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे, सचिन गदादे, रमेश तोकला, नितीन साळवे यांनी केली.