खासदार बाळू धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची भेट
चंद्रपूर : विदर्भातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी सध्या दौऱ्यावर असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आज चंद्रपुरात काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी त्यांना भूमिपुत्र विशेषांक भेट देत स्वागत केले.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पूरस्थिती, विकास कामे आणि काँग्रेस पक्षाच्या संघटन विषयक बाबींवर चर्चा झाली.
यावेळी आमदार अभीजित वंजारी, माजी आमदार अविनाश वारजूरकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, माजी बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, प्रदेश महासचिव विजय नळे, शहर महिला जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर,महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल राजा, महिला नेत्या अश्विनी खोब्रागडे, माजी नगरसेविका सुनिता अग्रवाल, घुग्गुस शहर अध्यक्ष राजू रेड्डी, ओबीसी शहर अध्यक्ष नरेंद्र बोबडे, युवा नेते शंतनू धोटे, नगरसेवक राजेश अडुर, माजी नगरसेवक पिंटू शिरवार, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, सुनील पाटील, कुणाल चहारे, ताजुद्दीन शेख, पप्पू सिद्दिकी, राज यादव, सौरभ ठोंबरे उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. धानोरकर दाम्पत्यांनी पूर परिस्थितीवर केलेल्या सूचना तात्काळ शासन दरबारी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याकरिता देखील त्वरित निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पडू असे देखील ते यावेळी म्हणाले.
In order to inspect the floods of Vidarbha, the Indian National Congress President Nana Poleale, who was present on the tour of Congress, visited Congress MP Balu Dhanorkar's public relations office in Chandrapur today. At this time, MP Balu Dhanorkar welcomed them visiting the land of the land.
At this time, both the leaders were discussed on floods, development works and Congress party organizations. At this time, MLA Avanash Warajari, former MLA Avinash Warajurkar, Senior Congress leader Vinod Dattatray, City District Congress President Ramu Tiwari, former Market Committee Chairman Dinesh Cheir, Pradesh General Secretary Vijay Vijayal, City Women District President Sangeeta Amritkar, Women District President Humanity Police, Minority District President Sohail Raja, Women leader Ashwini Khobragade, former corporator Sunita Agarwal, former corporator Sunita Agarwal, Ghugus City President Raju Reddy, OBC City President Narendra Bobde, Young leader Santhanu Dhote, corporator Rajesh Adur, former corporator Pintu Pintu, former corporator Gopal Amritkar, Sunil Patil, Kunal Kunare, Tajuddin Sheikh, Pappu Siddiqui, Raj Yadav, Saurav, Saurabh Tombay, had presence. Speaking on this occasion, the Indian National Congress President Nana Pollole appreciated the work of MP Balu Dhanorkar and MLA Talathai Dhanorkarkar. Dhanorkar, he said that the information on the flood conditions will present the immediate government. Along with this, he also said that the government would also be part of the government to announce the drought.
