सेल्फी काढण्यात व्यस्त करून अनोळखी व्यक्तींनी लांबविले 1 लाख रूपये
चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील घटना
चंद्रपूर : व्यापा-याला देण्यासाठी किराणा दूकानाच्या काऊंटर मध्ये ठेवलेले 1 लाख रूपये तिन अनोळखी व्यक्तींनी दूकानदाराची सेल्फी काढण्यात व्यस्त दूकानाच्या कांऊटरवरील ड्रावरमधून लंपास केल्याची घटना काल शनिवारी चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे उघडकीस आली आहे. या बाबत किराणा दूकानदार संजय ठाकरे तांनी चिमूर पोलिसात अज्ञात आरोपीं विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे मुख्यमार्गावर संजय ठाकरे यांच्या मालकीचे किराणा दुकान आहे. दररोज सकाळी सात वाजता दुकान सुरू करून रात्री नऊच्या सुमारास बंद केले जाते. किराणा दुकानांमध्ये बाहेरील होलसेल व्यवसायिकाकडून किराणा सामान खरेदी करून विक्री करावा लागतो. काही दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या किराणा सामानाचे पैसे देण्याकरिता महीला ग्रामीण पतसंस्था खडसंगी येथुन 1 लाख रूपये किराणा व्यापा-याला देण्याकरीता काढून दुकानाचे काऊंटरील ड्रॉवरमध्ये ठेवले होते. ही रक्कम आज रविवारी व्यापा-याला देण्यात येणार होती. काल शनिवारी सकाळी किराना दुकान सुरू करून मालाची विक्री सुरू असताना.
साडेसातच्या सुमारास तिन अनोळखी व्यक्ती दुकानात आले. ते व्यक्ती गावातील नव्हते तर अनोळखी होते. दूकानात येवून त्यांनी दुकानदारासोबत बोलण्यास सुरूवात करून 30 रूपयाच्या सामानाची खरेदी करून पाचशे रूपयाची नोट दिली. उर्वरीत पैसे वापस केल्यानंतर एका व्यक्तीने इंग्रजी दूकानदारासोबत इंग्रजी मधून संवाद साधत बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच लगतच्या एका डाॅक्टरासोबत बोलून त्यांच्या सोबत सेल्फी काढली. हा सर्व प्रकार सुरू असताना दूकानदार ठाकरे हे बाहेर निघाले असता त्यांचेसोबतही सेल्फी काढून तिघेही व्यक्ती तिथून निघून गेले. दुकानदार परत दूकानात आले आणि काऊंटलरीवर ड्रावर पाहिला असता त्यामधील 1 लाख रूपये रोख लाबविल्याचे निदर्शनास आले.
सेल्फी काढण्याच्या बहान्याने नजर चुकवित लाखाची रक्कम पळविल्याचे लक्षात येताच त्याचा पाठल्ग करण्यात आला परंतू तो पर्यंत ते पसार झाले होते. या बाबत आज रविवारी पोलिसात तक्रार करण्यात आली असुन अद्याप चोरांचा पत्ता लागला नाही.
The incident of 1 lakh rupees kept in the counter of a grocery store to be given to the shopkeeper by three unknown persons from the drawer on the counter of the shopkeeper who was busy taking a selfie has come to light at Khadsangi in Chimur taluka yesterday. In this regard, grocery shopkeeper Sanjay Thackeray has filed a complaint against unknown accused in Chimur police.
According to the police, there is a grocery shop owned by Sanjay Thackeray on the main road at Khadsangi in Chimur taluka. The shop opens at seven in the morning and closes at around nine in the evening. Grocery stores have to buy and sell groceries from outside wholesalers. In order to pay for the groceries purchased a few days ago, Mahila had withdrawn Rs 1 lakh from the Gramin Credit Union Khadsangi to the grocer and kept it in the counter drawer of the shop. This amount was to be given to the merchant on Sunday. Yesterday Saturday morning when the grocery store was opened and the goods were being sold.
Around 7:30, three unknown persons came to the shop. Those persons were not from the village but strangers. After coming to the shop, he started talking to the shopkeeper and bought goods worth 30 rupees and gave a note of 500 rupees. After returning the rest of the money, a man tried to communicate with the English shopkeeper in English. Also talked to a nearby doctor and took a selfie with him. While all this was going on, when Dukandar Thackeray went out, all the three persons took a selfie with him and left. The shopkeeper came back to the shop and when he looked at the drawer on the counter, it was noticed that Rs 1 lakh cash had been taken from it.
On the pretext of taking a selfie, he was chased as soon as it was realized that he had escaped with an amount of lakhs, but by then he had escaped. A complaint has been lodged with the police about this on Sunday and the thieves have not yet been traced.