युवकांच्या प्रवेशाने काँग्रेस बळकट- प्रकाश देवतळे 

चंद्रपूर : येथील शासकीय विश्रामगृहात काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या मार्गदर्शनात  घुग्घुस येथील शालिकराम नगर व गांधी नगरच्या अनेक युवकांनी दादू वर्मा यांच्या सह काँग्रेस पार्टीत प्रवेश घेतला. दादू वर्मा हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ता होते. त्यांच्या काँग्रेस पक्ष हा भाजपच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.

येत्या काही महिन्यात होऊ घातलेल्या नगर परिषद  निवडणुकीच्या दृष्टीने या युवकांचा पक्षप्रवेश काँग्रेससाठी फायद्याचा ठरणार आहे. मोठया संख्येत अनेक युवकांनी काँग्रेस पार्टीत प्रवेश केल्याने कॉग्रेस बळकट झाली आहे. काँग्रेसच्या विचारधारेचा स्वीकार करून युवकांनी प्रवेश केला याचा आनंद होत आहे मी सर्व युवकांचे काँग्रेस पार्टीत स्वागत करतो असे मनोगत काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी राजकुमार वर्मा, विमल वर्मा, सुमन मेडसीली, तन्वीर बेग, राजेश उडीयार, कोमल बावरीया, वेंकटस्वामी तलांडे, निर्भय सिंग, साहिल शेख, सोहेल शेख, सानू शेख, शैलेश तलांडे, संजय वर्मा, मोनू शेख, अंकुश कैथल, प्रमोद वर्मा, कमलेश बावरीया, बबलू मातो, भारत बरगेला, चिंता सारवा, आकाश केसकर, श्रीनिवास मेडसीली, रोहित चंद्रवंशी, धम्मू सोनटक्के, राहुल त्रिकुटला, अज्जू शेख, अरमान प्रसाद, कासीम शेख, अमोद वर्मा, अनवरुल हक, अमीर खान, अजय वर्मा, आशिष ताकसांडे, नितेश केसकर या पक्षप्रवेशीतांच्या गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत केले.

यावेळी घुग्घुस काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी, गणेश उईके, विक्रम गोगला, कामगार नेते अशपाक शेख, पवन नागपुरे, सुभाष तुमराम व हरीश जाधव उपस्थित होते.