रामदेवबाबाला ताबडतोब अटक करून जेलमध्ये टाका
पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा जोगेंद्र कवाडे यांची मागणी
चंद्रपूर : महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या रामदेव बाबाला ताबडतोब अटक करून जेल मध्ये टाकावे अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. चंद्रपुर शहरातील स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पतंजलीच्या महिला महासंमेलनाला योगगुरू रामदेवबाबांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावर प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी, तिव्र शब्दात रामदेव बाबाच्या अभद्र विधानाचा निषेध व्यक्त केला. महिलांबाबत अभद्र टिपणी केल्यामुळे सरकारने त्याला अटक करून जेलमध्ये टाकायला पाहिजे होत. ज्या छत्रपती शिवबांनी, महिलांचा सन्मान केला त्या महाराष्ट्रात येवून रामदेवबाबा महिलांबाबत गलिच्छ, अभ्रद टिपणी करीत असेल तर शिवबांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्राच्या सरकारनी रामदेवबाबाला अटक करून जेल मध्ये टाकायला पाहिजे होते. परंतु कुणीही काही बोलतांना दिसत नसल्याची खंड व्यक्त केली. राष्ट्रीय महिला आयोग व राज्य सरकारने त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी प्रा कवाडे यांनी केली.
ज्याप्रकारे रामदेवबाबांचा विरोध व्हायला पाहिजे तसा विरोध होतांना दिसत नाही तसेच महिला आयोगांनी ज्याप्रमाणे कठोर भूमिका घ्यायला पाहिजे तशी भूमिका घेत नसल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली. महिला संघटनांनी एकत्र येत रामदेवबाबा विरोधात तिव्र आंदोलन उभारायला पाहिजे असेही मत यावेळी त्यांनी मांडले. प्रा. जोगेंद्र कवाडे चंद्रपुर येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या महिला सक्षमीकरण मेळाव्याला आले असता चंद्रपुर विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत पत्रकांरांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष हरीश दुर्योधन, सुमेध मुरमाडकर, महिला जिल्हाध्यक्षा आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
People's Republican Party National President Prof. Jogendra Kawade has demanded that Ramdev Baba, who made offensive statements about women, should be immediately arrested and put in jail. He was speaking at a press conference held at a local rest house in Chandrapur city.
At Patanjali's Mahila Mahasammelana, Yoga Guru Ramdev Baba made offensive statements about women. Prof. Jogendra Kawade, strongly condemned Ramdev Baba's indecent statement. The government should have arrested him and put him in jail for making indecent comments about women. Chhatrapati Shivba, who honored women, if Ramdev Baba came to Maharashtra and made dirty and obscene remarks about women, then the government of Maharashtra, which took the name of Shivba, should have arrested Ramdev Baba and put him in jail. But he complained that no one was seen saying anything. Prof. Kawade demanded that the National Commission for Women and the state government should arrest her immediately.
He expressed his regret that Ramdev Baba is not being opposed in the way that should be opposed and the women's commissions are not taking a strict stance as they should be. At this time, he also expressed the opinion that women's organizations should come together and raise a strong movement against Ramdev Baba. Prof. When Jogendra Kawade came to Chandrapur for women's empowerment meeting of People's Republican Party, he interacted with the journalists in a press conference held at Chandrapur rest house. On this occasion, National Working President Jaideep Kawade, Chandrapur District President Harish Duryodhan, Sumedh Murmadkar, Women District President etc. were present.
