वाघांचा बंदोबस्त करा तरच मृतदेह उचला, संतप्त नागरिकांची भूमिका 

महिनाभरापासून पहार्णी, इरव्हा टेकडी परिसरात दहशत 

चंद्रपूर : सकाळच्या सुमारास शेतावर गवत घेण्याकरीता गेलेल्या एका 45 वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज शुक्रवारी (30 डिसेंबर) ला  नागभिड तालुक्यातील इरव्हा टेकडी येथील शेतशिवारात घडली. निर्मला प्रकाश भोयर असे मृतक महिलेचे नाव आहे.  दोन महिण्यापासून या परिसरात वाघाने दहशत माजवून तीन ते चार जणांचा बळी घेतता. मात्र वनविभागाने या परिसरातील वाघांचा बंदोबस्त करण्याकरीता दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या नागरिकांनी वनविभागाला मृतदेह ताब्यात घेण्यापासून रोखण्यात आले. पहिले बंदोस्त करा तरच मृतदेह ताब्यात घ्या अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. 

नागभीड-ब्रम्हपूरी वन विभागातंर्गत नागभीड प्रादेशिक वनविभाग मिंडाळा बिटामधील ईरव्हा (टेकडी) निवासी निर्मला प्रकास भोयर (वय 45) ही महिला आज शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नेहमी प्रमाणे स्वत:च्या शेतामध्ये गवत घेण्याकरीता गेली होती. महिलेचे शेत जंगलाला लागून आहे. वन्यप्राण्यांचा या  परिसरात नेहमी वावर आहे. तीन ते चार वाघांचे दर्शन या भागातील नागरिकांना नेहमीच होत असल्याने शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये दहशत आहे.  आज महिला गवत घेत असताना त्याच शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला केला. त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गाव व प रिसारात पसरताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेने पुन्हा नागरिकांच्या दहशतील पुन्हा वाढ झाली आहे. त्यानंतर या घटनेची माहिती नागभीड प्रादेशिक वनविभागाला देण्यात आली. तत्काळ वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. पहार्णी व इरव्हा परिसरात वाघाने आता पर्यंत चार ते पाच जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. नागरिकांनी अनेकदा वनविभागाला वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी रेटून धरली, परंतु वनविभागाने ठोस पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे घटनास्थळी दाखल झालेले वनपाल तावाडे यांना नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागले. बराचवेळ मृतदेहह उचलण्यापासून रोखण्यात आले. नागरिकांचे बळी घेणाऱ्या वाघांचा पहिले बंदोबस्त करा तरच मृतदेह ताब्यात घ्या अशी भूमिका घेतली. त्यामुळे वनविभागाला नागरिकांच्या रोषाच्या सामना करावा लागला. उपवन संरक्षक महेश गायकवाड व वन परिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी नागरिकांना समजवून वाघांचा बंदोबस्त तातडीने रकण्यात येईल अशी समजून घातली. त्यांनतर शेतात  पडून असलेला महिलेचा मृतदेह ताब्यात घेता आला. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून अंत्यसंस्काराकरीता आर्थीक मदत करण्यात आली.  

माजी ग्राम पंचायत सदस्य असलेली ही महिला नेहमीच सकाळी अन्य महिलांच्या सोबतीने गवत घेण्याकरीता जात होती. मात्र आज शुक्रवारी वाघाच्या हल्यात तिचा मृत्यू झाल्याने इरव्हा टेकडी परिसरात महिलेच मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या पश्चात मुलगा व मुलगी, सुन व नात आहे. वनाधिकाऱ्यांनी वाघांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या परिसरातील नागरिकांचे लक्ष त्यांच्या कारवाईकडे लागले आहे.