जिच्यावर प्रेम केलं तिलाच रक्ताच्या थारोळ्यात पाडलं; थरारक घटना
यवतमाळ : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरून हत्या केली आहे. घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील वाकी दुधाना शिवारात ही घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे. गजानन दत्ताजी ढोणे (26रा. बेलोरा) असे तरुणाचे नाव असून त्याने आत्महत्या केली आहे. तरूणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरूणी अल्पवयीन आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत तरूण गजानन आणि तरूणी यांचे प्रेमप्रकरण होते. गजानन यवतमाळच्या बेलोरा या गावात राहायचा. प्रेयसीला घेऊन एकांताच्या शोधात घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील वाकी दुधाना शिवारात आले. एका पडीक शेतात भेटीसाठी गेले. गप्पा मारताना अचानक त्यांच्यात वाद झाला. तयारीने आलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या गळ्यावर चाकूने वार केला आणि नंतर स्वतः झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
गजानन दत्ताजी ढोणे (26रा. बेलोरा) असे मृत प्रियकराचे नाव आहे. प्रेयसी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे. हे दोघेही दुचाकीने घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथून एकांताच्या शोधात वाकी दुधाना शिवारात आले. प्रेमात धोका दिल्याचा राग गजाननच्या डोक्यात होता. त्यामुळे त्याने सोबत चाकू व कटर आणले होते. गजाननने कोमलच्या गळ्यावर चाकूने वार केला. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. नंतर तिच्या ओढणीने गजाननने झाडाला गळफास लावून घेतला. यात गजाननचा जागीच मृत्यू झाला.
शेतातून घराकडे जात असणाऱ्या मजुरांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरूणी दिसली. मजुरांनी तात्काळ वडगाव जंगल पोलिसांना घटनेची माहिती दिली. तरूणीला वेळेवर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे ती वाचली. घटनास्थळावर मुलाची दुचाकी, मुलीची बॅग, धारदार चाकू व कटर आढळून आले. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
A shocking incident has come to light and the boyfriend has killed his girlfriend by slitting her throat. The incident took place at Waki Dudhana Shivara in Belora in Ghatji taluk. It is being said that this murder was done due to a love affair. The youth has been identified as Gajanan Dattaji Dhone (26th Belora) and has committed suicide. The girl is undergoing treatment at the hospital. The girl is a minor.
According to the preliminary information received in this regard, the deceased young man Gajanan and young woman had a love affair. Gajanan used to live in Belora village of Yavatmal. Waki Dudhana of Belora in Ghatji taluk came to Shivara with his beloved in search of solitude. Went for a visit to a deserted farm. Suddenly they had an argument while chatting. The unprepared boyfriend stabbed his girlfriend in the neck and then committed suicide by hanging himself from a tree.
The name of the deceased lover is Gajanan Dattaji Dhone (26th Belora). The girlfriend is seriously injured and undergoing treatment. Both of them came from Belora in Ghatji taluka on a two-wheeler to Waki Dudhana Shivara in search of solitude. Gajanan was angry at being threatened in love. So he had brought a knife and a cutter with him. Gajanan stabbed Komal's neck with a knife. She collapsed in a pool of blood. Later Gajanan hanged himself from the tree with her pull. Gajanan died on the spot.
The laborers who were going home from the farm saw a young woman lying in a pool of blood. The laborers immediately informed the Vadgaon forest police about the incident. The girl was admitted to the government hospital on time. So she survived. Boy's bike, girl's bag, sharp knife and cutter were found at the spot. Police are further investigating the incident.
