2022 सालात चंद्रपूरात 336 दिवस प्रदूषणाचे; 29 दिवसच आरोग्यदाही
पावसाळ्यातील चार महिण्यात 105 दिवस प्रदूषण
चंद्रपूर : तीन दिवसांपूर्वीच निरोप घेतलेल्या 2022 सालात चंद्रपूरातील प्रदूषणात आणखी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची दैनंदिन 24 तासातील हवा गुणवत्ता निरीक्षणाची 2022 ह्या वर्षातील प्रदूषणाची आकडेवारीतून दिली आहे. त्यामध्ये 365 दिवसात चंद्रपूर मध्ये केवळ 29 दिवस आरोग्यदायी होते. 336 दिवस प्रदूषण राहिले आहे. यामध्ये 164 दिवस कमी प्रदूषण, 150 दिवस जास्त प्रदूषण तर 22 दिवस आरोग्याकरीता अत्यंत हानिकारक राहिलेत. 2021 च्या तुलनेत 2022 चंद्रपूरकरच्या प्रदूषणात वाढ झाल्याने चंद्रपूरकरांची चिंता वाढली आहे.
मागील 2021 सालात 365 दिवसात 234 दिवस प्रदूषित होते. 102 दिवस आरोग्यदायी होते. तर 2022 सालात ३३६ दिवस प्रदूषित आढळून आले आहेत. केवळ 29 (चांगली श्रेणी) दिवस आरोग्यदायी आढळून आलेत. आरोग्यदायी जिवनाचे 73 दिवस कमी होवून प्रदूषणात वाढ झाली. 164 दिवस हे साधारण प्रदूषण श्रेणीत, 150 दिवस हे माफक प्रदूषण श्रेणीत, 20 दिवस अतिशय प्रदूषित श्रेणीत, तर 02 दिवस हानिकारक प्रदूषण श्रेणीचे ठरले आहेत. शहरात धोकादायक श्रेणीतील प्रदूषण नोंदविले गेले नाही. चंद्रपूर जिल्ह्यासोबतच, शहरात आणि औद्यौगिक क्षेत्र खुटाळा येथे 02 ठिकाणी दैनंदिन 24 तास वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राद्वारे वायू प्रदूषणाच्या नोंदी घेतल्या जातात. प्रदूषण नियंत्रण मंडळाने घोषीत केलेली आकडेवारी ही शहरातील केंद्रावरील आहे. या आकडेवारीची शासकीय यंत्रणेद्वारे नोंद केली असली तरी अनेक ठिकाणी या पेक्षाही जास्त प्रदूषण असलयाची माहिती. चंद्रपूर येथील पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 4 ओउद्योगिक क्षेत्रात घुग्घुस आणि राजुरा येथे जास्त प्रदूषण आहे.
पावसाळ्यात 105 तर हिवाळ्यात 111 दिवस प्रदूषण चंद्रपूर शहरातील मागील काही वर्षातील पावसाळा हा आरोग्यदायी मानला जात होता. परंतु आता पावसाळा ऋतूही धोकादायक ठरत आहे. 2022 वर्षात पावसाळ्यात 4 महिण्यातील 122 दिवसांपैकी 105 दिवस प्रदूषण राहिले. जून महिन्यात 30 दिवस, जुलै महिन्यात 31 दिवस, ऑगस्ट महिन्यात 27 दिवस तर सप्टेंबर महिन्यात 31 पैकी 17 दिवस साधारण ते माफक प्रदूषणाचे आढळून आले. 2021 आणि पूर्वीच्या सालातील पावसाळ्यात मात्र प्रदूषण फारसे नव्हते. पावसाळा प्रमाणे हिवाळा ऋतू आरोग्याकरीता चांगला मानला जातो. परंतु हिवाळा ऋतू चंद्रपूरकरांकरीता धोकादायक ठरत आहे. हिवाळ्यातील एकूण 123 दिवसापैकी 111 दिवस प्रदूषणाचे ठरले आहेत. भौगोलिक दृष्ट्या संथ हवा आणि कमी तापमान हे जास्त प्रदूषणास कारणीभूत ठरतात. ह्या ऋतूतील ऑक्टोबर महिन्यातील 23 दिवस प्रदूषित, नोव्हेंबर महिना 30 दिवस तसेच डिसेंबर महिन्यातील 31 पैकी 31 दिवस अतिशय जास्त प्रदूषण आढळून आले आहेत. वर्षातील डिसेंबर महिन्यात जास्त प्रदूषण ठरले आहे. जानेवारी 2022 मध्ये एकूण 31 दिवसापैकी 27 दिवस प्रदूषणाचे राहिले..
उन्हाळ्यातील सर्वच दिवसांत प्रदूषण
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे देशातील प्रदूषित क्षेत्रात सतत हवा गुणवत्ता मापन केंद्राव्दारे (CAAQMS) मोजणी केली जाते. चंद्रपूर मध्ये 02 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे. ह्यात सूक्ष्म धुलीकन, नायट्रोजन डाय ऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, कार्बनडाय ऑक्साईड आणि ओझोन किंवा कमीत कमी मुख्य तीन प्रदूषके ह्याद्वारे AQI निर्देशांक तयार केला जातो. प्रत्येक प्रदूषणाची स्वतंत्र नोंद असते, परंतु AQI साठी सर्व प्रदूषके मिळून सरासरी मोजली जाते.
चंद्रपूर मधील हवा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) 0-50 निर्देशांक हा आरोग्यांसाठी (Good) उत्तम मानला जातो तो आरोग्यासाठी चांगला आहे. चंद्रपूर मध्ये केवळ 29 दिवस आढळून आला.
51-100 निर्देशांक हा (Satisfactory) समाधानकारक प्रदूषित मानला जातो. आजारी असलेल्या लोकांना त्रासदायक ठरतो. चंद्रपूर मध्ये हा साधारण प्रदूषित निर्देशांक 164 दिवस होता.
101-200 निर्देशांक हा (Moderate) माफक प्रदूषित मानल्या जातो. हृदय, फुफ्फुसाच्या, दमा विकाराने ग्रस्त नागरिक, लहान मुले आणि वृद्धांना धोकादायक ठरतो. यामध्ये बाहेर व्यायाम करण्यावर बंधन असतात. चंद्रपूर मध्ये हा प्रदूषिन निर्देशांक 150 दिवस आढळला.
201-300 निर्देशांक हा आरोग्यासाठी हानिकारक (Poor/Unhealthy) श्रेणीत येत असून ह्यामुळे सर्व नागरिकांना श्वसन, हृदय व विविध आरोग्याच्या समस्या उदभवतात. यातमध्यक नागरिकांना बाहेर ठिकाणी व्यायाम करण्यास बंधन घातल्या जाते. चंद्रपूर मध्ये हा धोकादायक निर्देशांक 20 आढळून आला.
301-400 निर्देशांक हा (Very Poor) धोकादायक श्रेणीत येत असून चंद्रपूर मध्ये हा प्रदूषण निर्देशांक 02 दिवस आढळून आला. 401-500 निर्देशांक हा (Severe) घातक श्रेणीत येतो मात्र चंद्रपूर मध्ये ह्या श्रेणीतील प्रदूषण आढळून आले नाही.
चंद्रपूरातील प्रदूषणावर तातडीने उपाययोजनांची गरज : प्रा सुरेश चोपणे
चंद्रपूर शहरातील थर्मल पॉवर स्टेशन, परिसरातील विविध उद्योग तसेच वाहनांचे प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोकादायक ठरत आहे. आधुनिक जीवन शैलीमुळे घरात आणि औद्योगिक प्रदूषण, वाहनांचा धूर, धूळ, वाहतूक, कचरा ज्वलन, लाकूड, कोळसा ज्वलन आदी तसेच औद्योगिक क्षेत्रात कोळसा ज्वलन राख, दूषित वायू, वाहतूक आदींचा परिणाम जल, थल, ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे चंद्रपुरकर मागील 10 वर्षापासून त्रस्त आहेत. 2005 ते 06 च्या आरोग्य सर्वेक्षणामध्ये आरोग्य समस्येची भिषणता दिसूनआली. दरवर्षी चंद्रपूरच्या प्रदूषणात वाढ होत असल्याने श्वसनाचे रोग, दमा, टीबी, केंसर, सर्दी, खोकला, डोळे, त्वचा, आणि हृदय रोगांचे रुग्ण वाढत आहेत. स्थानिक आमदार किशोर जोरगेवरयांन नागपूरात पार पडलेल्या अधिवेशनात विचारणा केली होती. परंतु प्रशासनाने प्रदूषण नाही, रोगराई नाही परंतु कृती आराखडा सुरु असल्याचे उत्तर दिले. केवळ कृती आराखडे तयार करून उपयोग नाही तर उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अशी, प्रतिक्रीया पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे दिली आहे.