चंद्रपूर: भाजपचं आतापासूनच मिशन लोकसभा 2024 सुरू केलं आहे. त्यासाठीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी चंद्रपूर सभा घेतल्या. पण, चंद्रपुरातल्या नड्डांच्या सभेनंतर चर्चा रंगली ती सुधीर मुनगंटीवार यांची. सुधीर मुनगंटीवारांना थेट दिल्लीत पाठवणार असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. या चर्चा का रंगल्या? खरंच सुधीर मुनगंटीवारांनी दिल्लीत पाठवलं जाईल का? चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणितं काय?

मिशन 144 नुसार महाराष्ट्रातले 16 मतदारसंघ भाजपच्या हिटलिस्टवर आहेत. या मिशनचा शुभारंभ झाला तो चंद्रपुरातून. त्याची सुरुवात चंद्रपुरातून का झाली? तर त्यामागेही एक कारण सांगितलं जातं. काँग्रेसमुक्त भारत करायचा, असं भाजप नेते नेहमीच म्हणतात. त्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं ते चंद्रपुरात. कारण, इथं बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार निवडून आले. चार वेळा खासदार राहिलेले हंसराज अहीर यांचा पराभव झाला. हा भाजपला सर्वात मोठा धक्का होता. तेव्हापासून काँग्रेसकडे गेलेला हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थिती खेचून आणायचा असा निश्चयच भाजपनं केलेला दिसतोय. त्यासाठीच जे. पी. नड्डांची सभा झाली. नड्डांनी मुनगंटीवारांचं कौतुकही केलं. त्यानंतर मुनगंटीवारांना दिल्लीत पाठवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला, तर हंसराज अहीर चार वेळा खासदार राहिले. 2004 पासून त्यांचं चंद्रपूरवर एकहाती वर्चस्व होतं. 2019 च्या निवडणुकीतही अहीर यांचा विजय होईल असं बोललं जात होतं. त्याचं कारण होतं अहीर आणि मुनगंटीवार गटाची निवडणुकीत एकत्र ताकद दिसायची. 2019 चा निकाल लागला तेव्हा चित्र वेगळं होतं. हंसराज अहीर यांना मुनगंटीवारांच्या मतदारसंघात सर्वात कमी मतं मिळाली होती. पक्षांअंतर्गत कुरघोड्यांमुळे आपला पराभव झाला, असं अहीर यांनी वारंवार बोलू दाखवलं. 2019 पासून मुनगंटीवार आणि अहीर या दोन नेत्यांमधला संघर्षही लपून राहिला नाही. अहीर यांनी वेळोवेळी नाराजी बोलून दाखवली आहे.

चंद्रपुरातल्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 2 भाजपचे आमदार तर 3 काँग्रेसचे आहेत तर एक म्हणजे किशोर जोरगेवर हे अपक्ष आहेत. सहाही मतदारसंघात आपली ताकद कशी वाढवता येईल? यासाठी अहीर आणि मुनगंटीवार तयारीला लागलेले दिसतात. अहीर आर्णी, कोरपणा, जिवती तालुक्यांपर्यंत दौरे करत आहेत, तर मुनगंटीवार आपल्या मतदारसंघात अडकून न राहता राजुरा, वरोरा या विधानसभा मतदारसंघात दौरे करत आहेत. ज्येष्ठ नेते आहेत. ते सहा वेळा आमदार राहिले आहेत. भाजपनं त्यांना अर्थमंत्र्यांसारखी महत्वाची खातीही दिली. तसेच ते भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. ते उच्चशिक्षितही आहेत. इतकंच नाहीतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही दौऱ्यावेळी मुनगंटीवारांच्या कामाचं कौतुक केलं होतं. 2024 च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासमोर बाळू धानोरकर यांचं तगडं आव्हान असणार आहे. त्यामुळे त्यांच्या तोडीचा उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जातं.

बाळू धानोरकर यांनी अहीर यांचा पराभव केला होता. उमेदवार बदलून दुसऱ्या कोणाला तरी संधी द्यायची असाही भाजपचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे भाजप ही संधी मुनगंटीवारांना देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

चंद्रपुरात भाऊ आणि भैय्याचं राजकारण आहे. भाऊ म्हणजे सुधीर मुनगंटीवार आणि भैय्या म्हणजे हंसराज अहीर. आता येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देते? यासाठी आपल्याला 2024 ची वाट पाहावी लागेल. भाजप मुनगंटीवारांना खरंच लोकसभेत पाठवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

BJP has already started its mission Lok Sabha 2024. That is why BJP National President J.P. Nadda held the Chandrapur meeting. But, after the meeting of the Naddas in Chandrapur, the discussion took place about Sudhir Mungantiwar. Discussions have started now that Sudhir Mungantiwar will be sent directly to Delhi. Why did these discussions take place? Will Sudhir Mungantiwar really be sent to Delhi? What are the political calculations in Chandrapur-Vani Lok Sabha Constituency?

According to Mission 144, 16 constituencies in Maharashtra are on BJP's hit list. This mission was launched from Chandrapur. Why did it start from Chandrapur? There is also a reason behind that. BJP leaders always say that they want to make India free from Congress. It was in Chandrapur that the BJP's dream of making Maharashtra Congress-free in the 2019 Lok Sabha elections was shattered. Because Balu Dhanorkar was the only Congress MP elected here. Four-time MP Hansraj Ahir was defeated. This was the biggest blow to BJP. Since then, BJP seems to be determined to win this constituency, which has gone to Congress, at any cost. That's why J. P. A meeting of the Naddas was held. Nadda also praised Mungantivar. After that, discussions started about sending Mungantiwar to Delhi.

Considering the Chandrapur Lok Sabha constituency, Hansraj Ahir has been an MP for four times. Since 2004, he has single-handedly dominated Chandrapur. It was said that Ahir will win in the 2019 elections as well. The reason was that the Ahir and Mungantiwar groups would look strong together in the elections. When the 2019 results were out, the picture was different. Hansraj Ahir got the least number of votes in Mungantiwar's constituency. Ahir repeatedly said that his defeat was due to intra-party infighting. Since 2019, the conflict between the two leaders Mungantiwar and Ahir has not been hidden. Ahir has expressed his displeasure from time to time.

Out of the 6 assembly constituencies in Chandrapur, 2 MLAs belong to BJP, 3 belong to Congress and one, Kishore Jorgewar, is an independent. How can we increase our strength in all six constituencies? Ahir and Mungantiwar seem to be preparing for this. Ahir is touring Arni, Korpana, Jivati ​​talukas, while Mungantiwar is touring Rajura, Warora assembly constituencies instead of sticking to his constituency. Ahir is strong in Chandrapur, similarly Mungantivars are also dominant in Chandrapur.

Mungantiwar is a senior BJP leader. He has been MLA six times. BJP also gave him important accounts like Finance Minister. He has also been the state president of BJP. They are also highly educated. Not only this, BJP state president Bawankule also praised Mungantiwar's work during the visit. Balu Dhanorkar is going to have a tough challenge in front of the BJP candidate in the 2024 elections. Therefore, it is said that BJP is trying to give a candidate to replace him.

Ahir was defeated by Balu Dhanorkar. BJP may also try to change the candidate and give someone else a chance. Therefore, discussions are going on that BJP is going to give this opportunity to Mungantiwars.


There is politics of brothers and sisters in Chandrapur. Bhai means Sudhir Mungantiwar and Bhaiyya means Hansraj Ahir. Now in the upcoming Lok Sabha elections, who of the two BJP is fielding?  For this we have to wait for 2024.  But, will the BJP really send Mungantiwar to the Lok Sabha?  It will be important to see.